Cervical Cancer Saam tv
लाईफस्टाईल

Cervical Cancer : पूनम पांडेला झालेला गर्भाशयाचा कॅन्सर नेमका कसा होतो? काय आहेत लक्षणे?

Cervical Cancer Symptoms : जगभरात कॅन्सरच्या केसेस दरवर्षी वाढत आहेत. अशातच ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिर कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो. कॅन्सरचे अनेक प्रकार असले तरी ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्व्हिकल कॅन्सरचा सर्वाधिक धोका महिलांमध्ये आढळून येतो.

कोमल दामुद्रे

Poonam Pandey Died Cervical Cancer :

जगभरात कॅन्सरच्या केसेस दरवर्षी वाढत आहेत. अशातच ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिर कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो. कॅन्सरचे अनेक प्रकार असले तरी ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्व्हिकल कॅन्सरचा सर्वाधिक धोका महिलांमध्ये आढळून येतो.

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल पूनम पांडेच्या (Poonam Pandey) निधनाची बातमी समोर आली आहे. वयाच्या ३२ व्या वर्षी पूनमचे निधन झाले. तिला गर्भाशयाचा कॅन्सर झाल्यामुळे तिचे निधन झाल्याचे म्हटले जात आहे. गर्भाशयाचा कॅन्सर (Cancer) नेमका कसा होतो? त्याची लक्षणे (Symptoms) काय जाणून घेऊया.

भारतातील दर ५३ पैकी एक महिला गर्भाशयाच्या कर्करोगाने त्रस्त आहे. डॉक्टरांच्या मते, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. जगभरातील या कर्करोगाचा २५ टक्के पेक्षा जास्त प्रमाणात वाटा आहे. साधारणत: ४७ मिनिटांनी एका महिलेला कर्करोग होतो. तर देशभरात आठ मिनिटाला या रोगामुळे एका महिलेचा मृत्यू होतो.

हा आजार गुद्ववार किंवा लैंगिक संबंधातून एखाद्या व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीत पसरु शकतो. याचे प्रमाण ३५ ते ५५ वयाच्या महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून आले आहे. तसेच जास्त प्रमाणात धुम्रपान करणे, रोगप्रतिकारशक्ती, ५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर.

1. गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती?

  • सुरुवातीला या आजाराची कोणतीही लक्षणे दिसत नाही. जसजसा हा कर्करोग वाढत जातो तस तशी त्याची लक्षणे दिसू लागतात.

  • महिलांना मासिक पाळी आल्यानंतर किंवा लैंगिक संबंधानंतर अनियमित योनीतून रक्तस्त्राव होणे.

  • पाठीच्या खाली किंवा पायात वेदना होणे

  • अचानक वजन कमी होणे

  • भूक कमी लागणे

  • योनीतून दुर्गंधी येणे

  • दोन्ही पायांना सूज येणे

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत २ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे बदली?

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?

Saturday Horoscope: जोडीदारासोबत दिवस उत्तम, 5 राशींच्या व्यक्तींना पैशांची चणचण; वाचा शनिवारचे राशीभविष्य

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्र अव्वल; गणेशोत्सव चित्ररथाने मिळवला सर्वोच्च बहुमान

शरद पवार आणि अजितदादांची राष्ट्रवादी एक होणार? शोक सभेदरम्यान बड्या नेत्याने तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT