High Cholesterol मुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका! या पदार्थांचा आहारात करा समावेश

How To Control High Cholesterol : वातावरणातील बदलाचा सगळ्यात जास्त परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. बदलेली जीवनशैली, वातावरणातील गारवा, अपुरी झोप आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरावर त्याचा परिणाम होतो. यामुळे खराब कोलेस्ट्रॉल पातळी वाढते. त्यामुळे हृदयाला पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही.
High Cholesterol
High CholesterolSaam Tv
Published On

High Cholesterol Affect Heart :

वातावरणातील बदलाचा सगळ्यात जास्त परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. बदलेली जीवनशैली, वातावरणातील गारवा, अपुरी झोप आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरावर त्याचा परिणाम होतो. यामुळे खराब कोलेस्ट्रॉल पातळी वाढते. त्यामुळे हृदयाला पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही.

कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचे आहेत एक चांगले आणि दुसरे खराब. क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, कोलेस्ट्रॉल हा एक प्रकारचा लिपिड आहे. जो शरीराच्या आवश्यक कार्यांसाठी आवश्यक आहे. चरबीच्या कणांपासून बनलेले असल्याने ते रक्तात विरघळत नाही आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सहज पोहोचू शकते.

खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याचे मुख्य कारण आपला चुकीचा आहार (Food). यामुळे आपल्याला हृदयाच्या अनेक विकारांचा सामना करावा लागतो. याची पातळी कमी करण्यासाठी आहारात काही आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. आहारात फायबर समृद्ध अन्नपदार्थ यामध्ये उपयुक्त ठरु शकतात. ज्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.

1. ड्रायफ्रूट्स

बदाम आणि अक्रोड सारखे नट हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. अनसॅच्युरेटेड फॅट्ससोबतच त्यात विरघळणारे फायबर देखील आढळते. जे हृदयाला निरोगी (Heart Health) ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. ज्यामध्ये कॅलरी अधिक असते. याचे सेवन देखील कमी प्रमाणात करायला हवे.

High Cholesterol
World Cancer Day 2024 : स्तनाचा कर्करोग झाल्यावर काय कराल? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

2. ओट्स

ओट्समध्ये विरघळणारे फायबर आढळते, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास खूप फायदेशीर आहे. यासाठी याचा आपण नियमितपणे आहारात समावेश केल्यास हृदयासाठी चांगले ठरेल.

3. एवोकॅडो

एवोकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्ससोबत विरघळणारे फायबर देखील भरपूर प्रमाणात असतात. जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त ठरतात.

4. बेरी

बेरीमध्ये फायबरसोबत अँटी-ऑक्सिडेंट्स देखील असतात. जे हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

High Cholesterol
Never Drink Water After Tea : तुम्हालाही चहा प्यायल्यानंतर पाणी पिण्याची सवय आहे? होऊ शकतो गंभीर परिणाम, वेळीच थांबा

5. सफरचंद

सफरचंदमध्ये भरपूर फायबर असते. जे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते. तसेच हृदयासाठी देखील फायदेशीर आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com