Never Drink Water After Tea : तुम्हालाही चहा प्यायल्यानंतर पाणी पिण्याची सवय आहे? होऊ शकतो गंभीर परिणाम, वेळीच थांबा

Tea Side Effects: चहा आणि कॉफी पिण्याचे सेवन लोकांमध्ये अधिक प्रमाणात वाढले आहे. अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहा आणि कॉफीने होते. चहा प्रेमींना कोणत्याही क्षणी चहा प्यायला दिल्यास ते कधीही नाही म्हणत नाही.
Never Drink Water After Tea
Never Drink Water After TeaSaam Tv
Published On

Should You Drink Water After Having A Cup Of Tea :

चहा आणि कॉफी पिण्याचे सेवन लोकांमध्ये अधिक प्रमाणात वाढले आहे. अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहा आणि कॉफीने होते. चहा प्रेमींना कोणत्याही क्षणी चहा प्यायला दिल्यास ते कधीही नाही म्हणत नाही.

बरेचदा चहा पिताना आपण अशा अनेक चुका करतो ज्याचा आपल्या आरोग्यावर (Health) परिणाम होतो. अनेकांना चहा प्यायल्यानंतर पाणी पिण्याची सवय असते. या चुकीच्या सवयीमुळे (Habits) आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. थंड आणि गरम याचे कॉम्बिनेशन झाल्यास दात आणि पोटाच्या आरोग्यावर परिणाम होतो. जाणून घेऊया शरीराच्या कोणत्या भागावर चहा प्यायल्यानंतर पाणी (Water) प्यायल्याने परिणाम होतो त्याविषयी.

1. पोटाचे विकार

चहा प्यायल्यानंतर पाणी प्यायल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे पोटात वेदना होणे, अॅसिडीटीचा त्रास, कफ आणि इतर अनेक आजार उद्भवू शकतात.

Never Drink Water After Tea
Hair Care Tips : केसात सतत कोंडा होतो? केसगळती वाढलीये? कापूरमध्ये मिळवा या २ गोष्टी, केसांच्या समस्या होतील दूर

2. नाकातून रक्त येणे

चहा आणि पाण्याच्या सेवनाने नाकातून रक्त येऊ शकते. थंड आणि गरम पाण्याच्या कॉम्बिनेशनचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. शरीराला अनेक प्रकारच्या आरोग्याचा समस्यांचा सामना करावा लागतो.

3. दातांचे आरोग्य

गरम आणि थंड पाणी प्यायल्याने दातांवर परिणाम होतो. दातांचे आरोग्य बिघडते. चहा आणि कॉफीमध्ये टॅनिन नावाचे रसायन असते. ज्यामुळे दात किडतात. कॅफिनचा थर दातांवर जमा होतो.

Never Drink Water After Tea
Anxiety Triggers : तुम्हालाही सतत एन्जायटी होते? असू शकते हे कारण, वेळीच घ्या काळजी

4. खोकला-सर्दी

चहा प्यायल्यानंतर पाण्याचे सेवन केल्यास सर्दी- खोकल्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच लूज मोशनचा त्रास होतो. चहामुळे पोटात अॅसिडिटी वाढते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com