Pneumonia prevention saam tv
लाईफस्टाईल

Pneumonia prevention: हिवाळ्याच्या दिवसात वाढतोय न्यूमोनियाचा संसर्ग; तज्ज्ञांनी सांगितलेली काळजी तातडीने घ्या

Pneumonia risk factors: हिवाळा सुरू होताच श्वसनाशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढते. यामध्ये न्यूमोनिया संसर्ग सर्वाधिक आढळतो. लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, त्यांना या आजाराचा धोका जास्त असतो.

Surabhi Jayashree Jagdish

हिवाळा सुरू होताच वाढलेली थंडी, धुके आणि कोरड्या हवेमुळे श्वसनविकारांची प्रकरणं वाढू लागली आहेत. यामध्ये सर्वाधिक वाढ ही न्यूमोनिया या संसर्गजन्य फुफ्फुसांच्या आजारात दिसून येतेय. ज्यावेळी तापमानात घट होते तेव्हा अनेकांना फुफ्फुसांच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

नवी मुंबईतील खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्समधील फुफ्फुसविकार तज्ज्ञ डॉ. शाहिद पटेल यांनी सांगितलं की, लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच वयोगटात न्यूमोनियाचा संसर्ग आढळून येतो. यामध्ये खोकला येणं, ताप आणि थंडी वाजून येणं श्वास घेण्यास त्रास होणं, श्वास घेताना किंवा खोकताना छातीत दुखणं आणि अंगदुखी सारखी लक्षणं दिसून येतात.

तज्ज्ञांनी सांगितलेल्या या उपायांचं पालन करा

लसीकरण करा

न्यूमोकोकल लस ही तीव्र बॅक्टेरिया संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करते. दोन वर्षाखालील बालकं आणि 65 वर्षावरील व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे लसीकरण करून घ्यावं. ही लस संसर्ग रोखण्यास मदत करते आणि संसर्ग झाल्यास त्या संसर्गाची तीव्रता कमी करण्यास मदत करते.

योग्य स्वच्छता राखा

साबणाने स्वच्छ हात धुवावे, गरज पडल्यास सॅनिटायझरचा वापर करणे आणि आजारी व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी वावरणे टाळा आणि बाहेर पडताना मास्कचा वापर करा.

योग्य आहार घ्या

फळे, भाज्या आणि तृणधान्यांनी समृद्ध संतुलित आहाराची निवड करा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा. हायड्रेटेड रहा, नियमित व्यायाम करा आणि ७ ते ९ तासांची पुरेशी झोप घ्या.

धूम्रपान टाळा

धूम्रपान त्याचप्रमाणे सेकंड हॅंड स्मोकिंग किंवा वायू प्रदूषणाने फुफ्फुसांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि संसर्गाची शक्यता वाढते. बाहेरील हवेची गुणवत्ता खराब असताना शक्यतो घराबाहेर पडणं टाळलं पाहिजे.

३ दिवसांपेक्षा जास्त काळ लक्षणं आढळल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण वेळीच उपचार केल्यास भविष्यातील गुंतागुंत रोखता येते.

न्यूमोनियाच्या उपचारांमध्ये अँटीबायोटिक्स किंवा अँटीव्हायरल औषधांचे सेवन करणे, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास ऑक्सिजन थेरपी, गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णालयात दाखल करणे, पुरेशी विश्रांती घेणे, आहारात द्रवपदार्थांचा समावेश करणे आणि उपचार हे रुग्णाच्या गरजेनुसार तयार केले जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT