

हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत. अशा दिवसात आपण लहान बाळांची फार काळजी घेतोय. रात्रीच्या वेळेस हवेत गारवा असल्याने पालक झोपताना मुलांना चादर घालतात. मात्र लहान मुलं सवयीप्रमाणे काही वेळानंतर अंगावरील पांघरूण काढून टाकतात. अशावेळी बाळाला थंडी लागू नये म्हणून पालक स्वतःची झोपमोड करून सतत त्यांना चादर घालत असतात. यामुळे आईची स्वतःची झोप पूर्ण होत नाही आणि दुसऱ्या दिवशी थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.
जर तुमचीही अशीच अवस्था असेल तर तुमची चिंता दूर करण्यासाठी पीडियाट्रिशियन संतोष यादव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये डॉक्टर संतोष यांनी मुलं असं का करतात यामागे एक नव्हे तर पाच वैज्ञानिक कारणं सांगितली आहेत. ही कारणं नेमकी कोणती आहेत ती जाणून घेऊया.
डॉ. संतोष यादव सांगतात की, मुलांचे शरीर आणि त्यांच्या सवयी मोठ्यांपेक्षा खूप वेगळ्या असतात, त्यामुळे त्यांचा झोपण्याची पद्धतही वेगळी असते.
मुलांचा बॉडी मेटाबॉलिझम मोठ्यांच्या तुलनेत जास्त असतो. त्यामुळे त्यांना लवकर गरम होऊ लागतं. शरीराचं तापमान संतुलित ठेवण्यासाठी ते झोपताना अंगावरची चादर काढतात.
नवजात शिशूंमध्ये शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी असलेलं थर्मो-रेग्युलेशन पूर्णपणे विकसित झालेलं नसतं. त्यामुळे त्यांना सहजच हायपोथर्मिया (शरीर खूप थंड होणे) किंवा हायपरथर्मिया (शरीर खूप गरम होणे) होऊ शकतं. अशा वेळी चादर घेतल्यावर जर त्यांना किंचित उकडायला लागले तर ते लगेच ती काढून टाकतात.
जड, खरखरीत किंवा कडक चादर मुलांना आवडत नाही. मुलांना मऊ कापड फार आवडतं. जर चादर खूप जड असेल तर त्यांना घट्टपणा वाटत असेल आणि तर ते ती लगेच दूर करतात.
काही मुलांना मोकळेपणाने झोपायला आवडतं. चादर घेतल्यावर त्यांना वाटतं की, काहीतरी त्यांना अडवतंय म्हणून ते चादर सतत काढून टाकतात.
लहान मुलं झोपेत सतत हालचाल करतात. कुस बदलणं, पाय पसरवणं, पुढे-मागे सरकणं यामुळेही अनेकदा चादर आपोआप निघून जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.