Indian working women: नोकरी करणाऱ्या महिलांमध्ये हाडांच्या समस्या वाढतायत; भारतीय डॉक्टर्सनी दिला इशारा

Bone problems increasing in Indian working women: आजच्या काळात कॉर्पोरेट आणि आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतीय महिलांमध्ये हाडांशी संबंधित समस्या झपाट्याने वाढू लागल्या आहेत, अशी गंभीर चेतावणी भारतीय अस्थिरोग तज्ञांनी दिली आहे.
Indian working women
Indian working womenSAAM TV
Published On

तरुण महिलांमध्ये खासकरून 20, 30 आणि 40 च्या वयामध्ये सुरुवातीच्या काळात हाडांच्या समस्या वाढतायत. पूर्वी रजोनिवृत्तीनंतर दिसणाऱ्या ऑस्टिओपोरोसिस आणि व्हिटॅमिन D च्या कमतरतेच्या समस्या आता खूप लवकर दिसून येतोय. यावरून महिलांच्या हाडांच्या आरोग्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

वर्किंग वुमेंन्स म्हणजेच नोकरी करणाऱ्या महिलांनी त्यांच्या हाडांच्या आरोग्य प्राधान्याने पाहणं आवश्यक आहे. कारण बसून काम करण्याच्या नोकऱ्या, सूर्यप्रकाशाचा अभाव, ताणतणाव आणि अनियमित आहार यामुळे हाडांच्या समस्यांमध्ये वाढ होतेय. अनेक महिला नियमित तपासण्या टाळतात आणि लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. महिलांनी स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घ्यावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे.

सध्या कामकाज करणाऱ्या महिलांना ताण, वजन वाढ, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या समस्या तर आहेतच, पण त्यासोबत हाडांच्या समस्या देखील वाढत आहेत.

पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. अनुप गाडेकर म्हणाले, “अनेक कामकाज करणाऱ्या महिलांना लवकर ऑस्टिओपोरोसिस, व्हिटॅमिन D ची कमतरता आणि सांध्यातील वेदना यांसारख्या समस्या त्रास देतात. याचं कारण म्हणजे दीर्घकाळ बसून काम करणं, चुकीची बसण्याची पद्धत, सूर्यप्रकाशाचा अभाव, जेवण चुकवणे, कॅफिनवर अवलंबित्व आणि कॅल्शियमचे अपुरे सेवन.

Indian working women
World Mental Health Day : झोपेचा अभाव व मोबाईलमुळे वाढला मानसिक आजाराचा धोका; कल्याण- डोंबिवलीत ७७ रुग्णांवर उपचार सुरु

विशेषतः नोकरी करणाऱ्या महिला जास्त वेळ घरात किंवा ऑफिसमध्ये घालवतात. ज्यामुळे व्हिटॅमिन D ची कमतरता होते. 45 वर्षांखालील जवळपास 40 टक्के महिला OPD मध्ये गुडघेदुखी, पाठदुखी, थकवा आणि पोश्चरशी संबंधित समस्या घेऊन येतात. आणखी चिंताजनक बाब म्हणजे 25–35 वयोगटातील प्रत्येक तीन महिलांपैकी एकीला हाडांची घनता कमी असणे किंवा व्हिटॅमिन D ची कमतरता असल्याचे निदान होत आहे. हे तरुणांमध्ये एक ‘सायलेंट हेल्थ एपिडेमिक’ असल्याचे संकेत आहेत.

Indian working women
Mental health issues: मुलांच्या मनात नेमकं काय सुरु आहे? तज्ज्ञांनी सांगितलेल्या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

नोकरी करणाऱ्या महिलांमध्ये सामान्य लक्षणं म्हणजे पाठदुखी, गुडघेदुखी, stiffness आणि थकवा. याकडे दुर्लक्ष केल्यास वारंवार फ्रॅक्चर, पोश्चरमध्ये बिघाड आणि दीर्घकालीन हालचालींच्या समस्या उद्भवू शकतात. वेळेवर तपासणी, योग्य आहार आणि दररोज शारीरिक क्रियाकलाप हे हाडांचे आरोग्य जपण्यासाठी अत्यावश्यक आहेत.

उपाय आणि जीवनशैलीतील बदल

  • हाडांची घनता तपासणी करून लवकर निदान करणं आणि साधे जीवनशैलीतील बदल जसं की, संतुलित आहार, सकाळी चालणं, नियमित व्यायाम यामुळे मोठा फरक पडू शकतो.

  • हाडांचे आरोग्य हे फक्त वयावर अवलंबून नसते, तर जागरूकता आणि दररोजची काळजी यावर अवलंबून असते.

  • नियमित व्हिटॅमिन D आणि कॅल्शियम तपासणी करणं, योग्य पोश्चर ठेवणं, आहारात दूध, दही, हिरव्या पालेभाज्या, सुका मेवा आणि मासे यांचा समावेश करणं आवश्यक आहे.

  • चालणे, योगा किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंगसारखे वजन पेलणारे व्यायाम हाडे मजबूत करण्यास मदत करतात. महिलांनी आता हाडांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

Indian working women
Screen time impact: लहान वयात मुलांच्या हाती स्मार्टफोन देणं ठरतंय घातक; तरूणपणात करावा लागतोय मानसिक आरोग्याशी संघर्ष

नवी मुंबईच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्समधील जॉइंट रिप्लेसमेंट सल्लागार आणि ऑर्थोपेडिक विभागाचे संचालक डॉ. दीपक गौतम म्हणाले, “सांध्यातील वेदना, stiffness आणि ऑस्टिओपोरोसिसची लक्षणे जसं की पाठदुखी, वाकलेला पोश्चर आणि हाडं मोडणं या समस्या पूर्वी रजोनिवृत्तीनंतर दिसत होत्या, पण आता तरुण महिलांमध्येही दिसत आहेत.

Indian working women
Frequent IVF failure: वारंवार IVF फेल होत आहे? या कारणांमुळे १०–१५% जोडप्यांना यश मिळत नाही

याचं कारण म्हणजे चुकीचा आहार, शारीरिक क्रियाकलापांचा अभाव, व्हिटॅमिन D ची कमतरता आणि सूर्यप्रकाशाशिवाय दीर्घकाळ काम करणे. या समस्या टाळण्यासाठी महिलांनी कॅल्शियमयुक्त आहार घ्यावा. हिरव्या पालेभाज्या, सुका मेवा, सोयाबीन, टोफू, नियमित व्यायाम करावा, असंही डॉ. दीपक यांनी सांगितलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com