Frequent IVF failure: वारंवार IVF फेल होत आहे? या कारणांमुळे १०–१५% जोडप्यांना यश मिळत नाही

frequent IVF failure reasons 10 to 15 percent: इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) हे वंध्यत्वावरचं एक वरदान आहे. परंतु अनेक जोडप्यांसाठी हा प्रवास सोपा नसतो. वैद्यकीय आकडेवारीनुसार, साधारणपणे १० ते १५ टक्के जोडप्यांना IVF मध्ये वारंवार अपयश येतं.
IVF Treatment
IVF TreatmentSaam Tv
Published On

पुण्याच्या खराडीतील नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी डॉक्टरांच्या माहितीनुसार, एकूण आयव्हीएफ उपचारांपैकी जवळपास १० ते १५ टक्के प्रकरणमध्ये अपयश येतो. यामध्ये काही जोडप्यांना अपयशाचा सामनाही करावा लागतो. एकंदरीत पाहिल्यास हे प्रमाण मुख्यतः ३५ वर्षांवरील महिलांमध्ये जास्त दिसून येतंय.

तीन किंवा अधिक वेळा उपचार अपयशी झाल्यास त्याला रिपीटेड आयव्हीएफ फेल्युअर असं म्हणतात. अशा अपयशामुळे रुग्ण भावनिकदृष्ट्या खचतात. पण तज्ज्ञांच्या मते, हल्ली वैद्यकीय प्रगतीमुळे या कारणांमुळे खचून न जाता धैर्याने सामना करणं गरजेचं आहे .

फर्टिलिटी तज्ज्ञांच्या मतानुसार, स्त्रीबीज किंवा शुक्राणूंची गुणवत्ता, गर्भाशयातील पॉलिप्स-फायब्रॉइड्स, जनुकीय दोष, जीवनशैली किंवा गर्भाशयाच्या अस्तरातील समस्या ही यामागची प्रमुख कारणं आहेत. प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास करुन योग्य उपचार योजना आखणं गरजेचं आहे.

IVF Treatment
Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्यापूर्वी फक्त रात्री दिसतात ही लक्षणं; दुर्लक्ष करू नका

खराडीतील नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. निशा पानसरे यांनी सांगितलं की, गर्भाशयासंबंधी विकारामुळे गर्भारोपणात अडचणी येऊ शकतात. काही वेळा Embryo structurally सामान्य दिसतो. मात्र जरी असं दिसत असेल तरी जनुकीय दोषामुळे त्याचे यशस्वीपणे रोपण होत नाही. अशा वेळी Preimplantation Genetic Testing (PGT) म्हणजेच गर्भरोपणपूर्वी केली जाणारी अनुवांशिक चाचणी महत्त्वाची ठरते.

IVF Treatment
Diabetes Diet : डायबिटीज रुग्णांनी 'हा' सुकामेवा खाणे टाळा, अन्यथा वाढेल रक्तातील साखर अन् येईल हार्ट अटॅक

पिंपरी-चिंचवडमधील नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. माधुकरी शिंदे सांगतात की, एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी ॲरे (ERA) चाचणीद्वारे गर्भारोपणासाठी योग्य वेळ ठरवता येतो. लेझर असिस्टेड हॅचिंग (Laser Assisted Hatching) हे प्रयोगशाळेत केलं जाणारं तंत्र आहे, ज्यामध्ये लेझरच्या मदतीने भ्रूणाच्या बाहेरील थरात एक छोटं छिद्र केलं जातं. यामुळे भ्रूण गर्भाशयात नीट रोपण होण्यास मदत होते. एम्ब्रियो ग्लु हे एक खास माध्यम आहे, जे भ्रूण रोपण प्रक्रियेत सहाय्य करण्यासाठी वापरलं जातं. अशा तंत्रांमुळे गर्भारोपणाचा यशदर वाढतो.

IVF Treatment
Blood Pressure Impact: नॉर्मल ब्लड प्रेशर असूनही येऊ शकतो हार्ट अटॅक? धडकी भरवणारा संशोधनाचा दावा समोर!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com