पोटातील गॅस बाहेर सोडताना आवाज का होतो? पाहा वैज्ञानिक कारण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शरीरातून गॅस बाहेर पडणं

फार्टिंग म्हणजेच शरीरातून गॅस बाहेर पडणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामध्ये शरीरातून विषारी वायू बाहेर टाकले जातात.

आवाज का येतो?

पण तुम्ही कधी विचार केलाय का की, गॅस बाहेर पडताना आवाज का येतो? हा प्रश्न अनेकांना सतावतो.

कारण

फार्टिंग करताना आवाज येण्याचं कारण म्हणजे आतड्यांमधून गॅस बाहेर पडल्यावर तो गुदद्वाराच्या भिंतींवर आदळतो. यामुळे कंपन निर्माण होतात आणि आवाज होतो.

गॅस तयार होण्याची कारणं

पोटातील अन्नाचं अयोग्य पचन, कार्बोनेटेड पेयं किंवा जास्त फायबर असलेलं अन्न आतड्यांमध्ये हवा भरतं. यामुळे गॅस तयार होतो.

जास्त गॅस होण्यामागील कारण

जर तुम्ही खूप तळलेले पदार्थ, बीन्स, कांदे, कोबी किंवा दुधापासून बनवलेल्या गोष्टी खाल्ल्या तर त्यामुळे गॅस तयार होऊ शकतो.

गॅस दाबून ठेवणं

गॅस जास्त वेळ दाबून ठेवल्याने आतड्यांवरील दाब वाढतो, त्यामुळे गॅस मोठ्या आवाजाने बाहेर पडतो.

जठरासंबंधी समस्या

जर गॅस शरीराबाहेर पडताना वेदना होत असेल किंवा वायूला दुर्गंधी येत असेल तर ते अपचन, बद्धकोष्ठता किंवा जठरासंबंधी समस्यांचे लक्षण असू शकते.

महिला गुगलवर सर्वाधिक काय सर्च करतात, वाचून तुम्हाला बसेल धक्का

Women Search the Most on Google | saam tv
येथे क्लिक करा