Diwali Shopping List 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Diwali Shopping List 2023 : दिवाळीला शॉपिंगचा प्लान करताय? गरजेच्या सामानाची यादी बनवताना या स्मार्ट शॉपिंग टिप्स लक्षात ठेवा

Shopping List For Diwali : दिवाळी हा पाच वेगवेगळ्या सणांचा सण आहे, ज्याची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते.

Shraddha Thik

Smart Tips For Shopping :

येत्या नोव्हेंबरमध्ये दिवाळी येणार आहे. 10 तारखेपासून धनत्रयोदशी आहे याच दिवशी दिवाळीची सुरूवात होईल. दिवाळी हा पाच वेगवेगळ्या सणांचा सण आहे, ज्याची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. धनत्रयोदशीनंतर छोटी दिवाळी आणि नंतर दिवाळी साजरी केली जाते.

यानंतर बलिप्रतिपदा आणि भाऊबीजचा सण (Diwali) येतो. या पाच दिवसांच्या विशेष सणाची उत्सुकता सर्वांनाच असते. अनेक दिवस आधीच तयारी सुरू होते. अनेकदा लोक दिवाळीच्या दिवसापर्यंत बाजारपेठांमध्ये फिरत असतात.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिवाळीच्या निमित्ताने लोक अनेकदा बाजारात (Market) जातात. पूजेच्या वस्तूंपासून ते गृहसजावटीच्या वस्तूंपर्यंत, पूजेची भांडी आणि मूर्तींपासून ते कुटुंबातील सदस्यांसाठीच्या कपड्यांपर्यंत बरीच खरेदी करतात. धनत्रयोदशीच्या काळात लोक भेटवस्तूंसाठी भरपूर खरेदी करतात.

दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा-पुन्हा बाजारात जाणे टाळायचे असेल आणि सणाची सर्व खरेदी एकाच वेळी करायची असेल, तर दिवाळीच्या (Diwali) खरेदीची संपूर्ण यादी आधीच तयार करा. दिवाळीच्या खरेदीच्या यादीवर आधारित खरेदी करा.

दिवाळी खरेदीची यादी

  • दिवाळी, गोवर्धन पूजा आणि भाईबीजेचे साहित्य

  • घर सजावटीच्या वस्तू

  • कपडे आणि भेटवस्तू

दिवाळी पूजा साहित्य यादी

  • गणपती आणि लक्ष्मीच्या मूर्ती

  • लहान-मोठे मातीचे दिवे

  • कापसाची वात

  • दिवे लावण्यासाठी तेल किंवा तूप

  • अक्षता, हळद, कुंकू

  • प्रसादामध्ये गणपतीसाठी लाडू आणि देवी लक्ष्मीसाठी मिठाई

  • फुले आणि पाने

  • चांदीचे नाणे

सजावटीच्या वस्तू

  • रांगोळीसाठी रंग

  • फ्लॉवर

  • विद्युत दिवे

कपडे आणि भेटवस्तू

  • कुटुंबातील सदस्यांसाठी कपडे, दिवाळी

  • भाऊबीजसाठी भेटवस्तू, मिठाई, फळे.

सर्वात पवित्र महिना कार्तिकच्या पंधराव्या दिवशी दिवाळी साजरी केली जाते. यंदा दिवाळी रविवारी, 12 नोव्हेंबर रोजी दिव्यांचा सण साजरा केला जाणार आहे. हा शुभ सण साधारणपणे पाच दिवस चालतो, प्रत्येक दिवसाचे स्वतःचे वेगळे महत्त्व आणि विधी असतात. तसेच दिवाळीची पूजा विशिष्ट शुभ काळात केली जाते. भक्त धन, समृद्धी आणि बुद्धीसाठी देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाचे आशीर्वाद घेतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

निवडणुकीचं बिगुल वाजलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाची पहिली यादी जाहीर, प्रसिद्ध गायकाला मिळाली उमेदवारी

SCROLL FOR NEXT