Pizza History  Saam TV
लाईफस्टाईल

Pizza History : एकेकाळचं गरीबांचं खाणं असणाऱ्या पिझ्झाचा आज जगभरात दबदबा; काय आहे इतिहास?

Fast Food Pizza History : पिझ्झाचा इतिहासही तितकाच रंजक आहे. गरीब आणि मजुरांसाठी तयार करण्यात आलेला पदार्थ एका घटनेमुळे प्रसिद्ध झाला, लोकप्रिय झाला. काय आहे पिझ्झाची कहाणी, जाणून घेऊयात.

Rutuja Kadam

फास्ट फूडमधील सर्वाधिक पसंतीचा पदार्थ म्हणजे पिझ्झा! पिझ्झा न आवडणारा क्वचितच कोणी असेल. सोहळा काही असला तरी पिझ्झा खाण्यासाठी सर्वजण उत्साही असतात. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत पिझ्झा म्हणजे आवडीचा पदार्थ! मूळचा इटलीचा असणारा हा पिझ्झा आज जगभरात तयार केला जातो, विकला जातो. या पिझ्झाचा इतिहासही तितकाच रंजक आहे. गरीब आणि मजुरांसाठी तयार करण्यात आलेला पदार्थ एका घटनेमुळे प्रसिद्ध झाला, लोकप्रिय झाला. काय आहे पिझ्झाची कहाणी, जाणून घेऊयात...

पिझ्झा ही इटलीची भेट मानली जाते. इथेच ते गरीबांसाठी बनवले गेले. इथूनच पिझ्झामध्ये एवढा मोठा बदल झाला की तो इतर देशांत पोहोचला आणि जगाचा लक्झरी फूड बनला. पिझ्झाची सुरुवात १८व्या शतकात इटलीतील नेपल्स शहरात झाली. युरोपातील समृद्ध शहरांमध्ये नेपल्सची गणना होते. याठिकाणी होत असलेल्या आर्थिक घडामोडींमुळे दूरदूरच्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना रोजगाराच्या शोधात याठिकाणी यावे लागले. शेतकरी आणि मजुरांसाठी स्वस्त भाजीपाला आणि मांसाचे तुकडे एका मोठ्या सपाट ब्रेडवर ठेवून रस्त्याच्या कडेला विकले जात होते. ज्याचे तुकडे करून विकले जात होते. स्वस्त दरात त्याची विक्री होत असल्याने मजूर, शेतकरी यातून पोट भरायचे.

या परिसरात हळूहळू मीठ, लसूण, डुकराचे मांस, टोमॅटो, मासे आणि काळी मिरी यांचा वापर वाढला. त्यामुळे पिझ्झाची चवही वाढली. येथील सर्वसामान्यांनाही त्याची चव आवडू लागली आणि त्याची विक्री वाढली. पण खऱ्या अर्थाने आधुनिक पिझ्झा 1889 मध्ये सुरू झाला. याचे श्रेय नेपल्स शहरातील बेकर राफेल एस्पिओसिटो यांना जाते.

1889 मध्ये, राजा उम्बर्टो पहिला आणि राणी मार्गेरिटा नेपल्समध्ये आले. त्याला फ्रेंच जेवणाची आवड असल्याने त्याला सर्वाधिक वेळा तेच जेवण दिलं जाई. तेच तेच अन्न पदार्थ खाऊन कंटाळा आल्यावर राफेल एस्पिओसिटो यांना काहीतरी नवीन देण्यासाठी बोलावण्यात आले. राफेलने पाहुण्यांसाठी तीन प्रकारचे पिझ्झा बनवले. तिघांपैकी राणी मार्गेरिटाला मोझझेरेला चीज वापरून बनवलेला पिझ्झा सर्वात जास्त आवडला, म्हणून त्या पिझ्झाचे नाव 'मार्गेरिटा' ठेवण्यात आले. जो आजच्या घडीला जगभरात लोकप्रिय झाला आहे.

19व्या शतकात इटालियन लोकांनी ही पिझ्झाची रेसिपी अमेरिकेत सादर केली. अशाप्रकारे पिझ्झा अमेरिकेत प्रसिद्ध होऊ लागला. 'लोम्बार्डी' हे पहिले पिझ्झा रेस्टॉरंट 1905 मध्ये न्यूयॉर्क शहरात सुरू झाले. कालांतराने पिझ्झामध्ये अनेक बदल झाले आणि ते अधिक महाग झाले. परिणामी, तो गरीबांपासून दूर गेला आणि श्रीमंतांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग बनला. आजही पिझ्झा हे महागडे लक्झरी फूड म्हणून सादर केले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT