Pitru Paksha 2025 saam tv
लाईफस्टाईल

Pitru Paksha 2025 : पितृपक्ष ७ सप्टेंबरपासून सुरू, या 4 राशींनी वेळीच जाणून घ्या उपाय; अन्यथा...

Shraddh 2025 : पितृपक्ष २०२५ हा ७ सप्टेंबरपासून सुरू होऊन ३१ सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. राशीनुसार परिणाम आणि शुभ उपाय जाणून घ्या आणि पूर्वजांचे आशीर्वाद मिळवा.

Sakshi Sunil Jadhav

यंदाच्या वर्षी पितृपक्ष ७ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होऊन ३१ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचा खास काळ मानला जातो. या कालावधीत ५ राशींवर वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम दिसून येणार आहेत. पुढे आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

मेष राशीच्या व्यक्तींवर या काळात जबाबदाऱ्या वाढताना दिसतील. त्यांना आपल्या निर्णयांमध्ये विशेष काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे मंगळवारी हनुमान चालीसाचे पठण न चुकता करुन घ्या. तुम्ही पूर्वजांना लाल फुलं अर्पण करु शकता. हे अत्यंत शुभ मानले जाईल.

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक चढ-उतार घेऊन येऊ शकतो. कुटुंबात जुन्या गोष्टींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांनी पांढरे तीळ वापरणे आणि घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेणे हे लाभदायी ठरेल.

मिथुन राशीच्या व्यक्तींना कामात अडथळे येऊ शकतात आणि मानसिक ताण जाणवू शकतो. त्यामुळे त्यांनी शांत राहून काम करणे गरजेचे आहे. या दिवसांमध्ये तुम्ही हरभरा हिरव्या भाज्यांचे दान करावे. तसेच पूर्वजांना तुळशीची पाने अर्पण करावीत. हे अत्यंत शुभ मानले जाईल.

कर्क राशीच्या लोकांसाठी पितृपक्षाच्या दिवसांत कौटुंबिक वातावरण गोड राहील, मात्र पैशांचा खर्च जास्त होऊ शकतो. अशा वेळी सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करणे आणि कावळ्यांना अन्न घालणे हे शुभ फलदायी ठरेल.

या वर्षीचा पितृपक्ष प्रत्येक राशीसाठी काही वेगळे अनुभव घेऊन येणार आहे. श्रद्धा आणि योग्य उपाय यांच्या माध्यमातून या काळात सकारात्मक परिणाम मिळवता येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हिंगोलीत मुसळधार पाऊस, इसापूरमध्ये गावकरी अडकले

बीडचा उद्योजक तरूण गर्लफ्रेंडला भेटायला सोलापुरात गेला, कारमध्ये आढळला मृतदेह; पोलिसांना वेगळाच संशय

Karishma Kapoor Children: संजय कपूरच्या प्रॉपर्टीत हिस्सा पाहिजे; करिश्मा कपूरच्या मुलांची हायकोर्टात धाव, नेमका वाद काय?

Maharashtra Tourism: नैसेर्गिक सौंदर्य अन् मनमोहक दृश्ये; मालेगावपासून हाकेच्या अंतरावर वसलंय एक सुंदर ठिकाण, एकदा भेट द्याच

Bharli Vangi Recipe : गावरान भरली वांगी, रेसिपी पाहून तोंडाला सुटेल पाणी

SCROLL FOR NEXT