Tongue color and health saam tv
लाईफस्टाईल

Tongue color and health: गुलाबी, लाल की पांढरा...तुमची जीभ काय सांगते? रंगावरून जाणून घ्या तुम्ही आजारी आहात की नाही!

Diagnose illness from tongue color: आपल्या जिभेचा रंग तुमच्या आरोग्याबद्दल अनेक महत्त्वाचे संकेत देतो. अनेकदा डॉक्टरही रुग्णांची तपासणी करताना त्यांच्या जिभेचा रंग आणि स्थिती तपासतात, कारण जीभ ही शरीरातील अनेक अंतर्गत बदलांचे प्रतिबिंब असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपल्याला काहीही समस्या असेल तर किंवा बरं वाटत नसेल अशावेळी शरीर काही ना काही संकेत देत असतं. मग ते हात असतील पाय असतील किंवा जीभ असेल. फार कमी लोकांना कल्पना आहे की, आपल्याला आजाराचे संकेत हे जीभेच्या माध्यमातून देखील समजतात. यावेळी जीभेचा रंग तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयी माहिती देतो.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जिभेचा रंग आणि पोत तुमच्या आरोग्याबद्दल बरीच माहिती देतात. बऱ्याचदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र जिभेच्या रंगात बदल होणं हे शरीरात सुरू असलेल्या आजारातचं लक्षण असू शकतं. जर तुम्हीही सकाळी उठल्याबरोबर तुमची जीभ आरशात पाहत नसाल तर आतापासून ती सवय लावा.

ज्यावेळी शरीरात कोणताही संसर्ग, व्हिटॅमिनची कमतरता, हार्मोनल बदल किंवा इतर कोणताही गंभीर आजार होतो तेव्हा जिभेचा रंग बदलू लागतो. जिभेचे वेगवेगळे रंग कोणत्या आजाराचे संकेत देतात ते आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून जाणून घेऊया.

गुलाबी रंगाची जीभ

जर तुमची जीभ सामान्य गुलाबी रंगापेक्षा खूप फिकट गुलाबी किंवा जवळजवळ पांढरी दिसत असेल, तर ॲनिमिया किंवा डिहायड्रेशनचा धोका असू शकतो. शिवाय व्हिटॅमिन बी १२ (B12) आणि फॉलिक ॲसिडच्या कमतरतेमुळे जीभ लाल आणि गुळगुळीत दिसू शकते.

लाल जीभ

जर तुमची जीभ लाल आणि चमकदार होत असेल तर तुमच्या शरीरात व्हिटॅमीनची कमतरता असू शकते. यामुळे जीभेवर सूज येण्याचा धोकाही असतो. यामुळे तुम्हाला वेदना देखील होऊ शकतात.

जीभ पिवळी पडणं

जीभेचा रंग पिवळा होणं हे अनेक गोष्टींचं लक्षण असू शकते. बऱ्याचदा, ही केवळ तोंडाच्या खराब स्वच्छतेमुळे, म्हणजे जिभेवर मृत पेशी, बॅक्टेरिया आणि अन्नाचे कण जमा झाल्यामुळे होतं. याशिवाय धूम्रपान किंवा काही विशिष्ट पदार्थ व पेयं (उदा. कॉफी, काळा चहा) यांच्या अतिसेवनामुळेही जीभ तात्पुरती पिवळी दिसू शकते.

जीभ पांढरी पडणं

जर तुमची जीभ पांढरी पडत असेल तर ते फंगल इन्फेक्शनचं लक्षण असू शकतं. शिवाय डिहायड्रेशन किंवा पचन तंत्रामध्ये गडबड झाल्यामुळे देखील हे लक्षण दिसून येण्याची शक्यता असते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT