Stomach Cancer: पोटाच्या कॅन्सरपूर्वी महिलांच्या शरीरात दिसतात 'हे' बदल; अजिबात दुर्लक्ष करू नका

Stomach Cancer: पोटाच्या कर्करोगाची लक्षणे पुरुष आणि महिलांमध्ये वेगळी असतात का? असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. महिलांमध्ये खासकरून याची कोणती लक्षणं दिसून येतात ते पाहूयात.
Stomach Cancer
Stomach Cancersaam tv
Published On

कोणत्याही गंभीर आजाराची लक्षणं शरीर आपल्याला देत असतं. यामध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लक्षणं देखील आपल्याला दिसून येतात. यामध्ये पोटाच्या कॅन्सरची लक्षणं काय असतात हे पाहूयात. पोटाच्या कर्करोगाची लक्षणे पुरुष आणि महिलांमध्ये वेगळी असतात का? असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो.

कर्करोगाची लक्षणे स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये सारखीच दिसून येतात. मात्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ही लक्षणं प्रत्येक व्यक्तीप्रमाणे वेगळी असतात. पोटाच्या कॅन्सरची खास कोणतीही विशिष्ट लक्षणं दिसत नाहीत. परंतु सामान्य लक्षणांकडे वेळीच लक्ष दिल्यास उपचार करता येतात. महिलांमध्ये खासकरून याची कोणती लक्षणं दिसून येतात ते पाहूयात.

Stomach Cancer
Reduce Cholesterol: शरीरातील रक्तवाहिन्यांना ब्लॉक करतं LDL कोलेस्ट्रॉल; नसांना पूर्ण साफ करतील 'हे' काळे पदार्थ

पोटात वेदना होणं

पोटाचा कॅन्सर असल्यास पोटात तीव्र वेदना आणि पोटात सूज येण्याची समस्या जाणवते. कोणत्याही कारणाशिवाय वेदना होत राहिल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

पोटफुगीची समस्या

खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे फुगण्याची समस्या उद्भवण्याचा धोका असतो. ब्लोटींग म्हणजेच पोटफुगीची समस्या आपण सामान्य म्हणून सोडून देतो. मात्र दीर्घकाळ त्रास होत असेल तर ते पोटाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. पोट नेहमी फुगल्यासारखे वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

शौचातून रक्त पडणं

पोटाच्या कॅन्सरच्या लक्षणांमध्ये शौचातून रक्तस्राव होण्याचा धोका असतो. त्यामुळे असा त्रास झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. अन्यथा परिस्थिती गंभीर होऊ शकते. यावेळी तातडीने डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे.

उल्टी होणं

जर तुम्हाला सतत उलट्या आणि मळमळ होत असेल तर ते पोटाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. अनेकदा अपचन किंवा चुकीच्या खाण्याने देखील हा त्रास होऊ शकतो. मात्र सतत तुम्हाला ही समस्या जाणवत असेल तर तुम्ही डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे.

छातीत जळजळ होणं

छातीत जळजळ होणं आणि वेदना होणं ही देखील पोटाच्या कर्करोगाची लक्षणं आहेत. पोटात कॅन्सर झाला की, पचनक्रिया बिघडते. परिणामी छातीत जळजळ आणि ऍसिड रिफ्लक्सची समस्या उद्भवू शकतात.

Stomach Cancer
Heart Attack Symptoms : केवळ छातीतील वेदनांना हार्ट अटॅकचं लक्षण समजू नका; शरीराच्या 'या' भागातील वेदनाही असतात संकेत

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com