WhatApp Storage Cleaning Tips : WhatsApp जगामधील सर्वात पॉप्युलर इन्स्टंट मेसेज आहे. लाखो करोडोंच्या संख्येने लोक दररोज WhatsAppवरती मेसेज एकमेकांना पाठवतात. WhatsAppचा सर्वात जास्त वापर जास्त करून फोटो व्हिडिओ आणि डॉक्युमेंट पाठवण्यासाठी केला जातो.
WhatsApp बऱ्याचदा डिफॉल्टच्या रूपामध्ये तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये फोटो किंवा व्हिडिओ सेव्ह करते. अशाने तुमच्या फोनच स्टोरेज पूर्णपणे भरून जाते.
फोनमधील स्टोरेज खाली करण्याचा सर्वात पहिला मार्ग म्हणजे तुम्ही तुमच्या फोन मधील फोटो आणि व्हिडिओ (Video) निवडून डिलीट करा. परंतु यामध्ये भरपूर वेळ (Time) वाया जातो.
या मल्टीमीडिया फाईल्समुळे लोकांच्या फोनमधील (Phone) स्टोरेज भरून जाते. परंतु तुम्हाला चिंता करायची काही गरज नाही. तुम्ही फार कमी वेळामध्ये फोन स्टोरेज खाली करू शकता. चला तर मग जाणून घेऊ.
फोन मधील तुम्हाला नको असलेले फोटो आणि व्हिडिओ निवडून डिलीट करून टाका. परंतु यामध्ये खरंच जास्त वेळ जातो. मीडिया फाईलला फोनच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यापासून थांबवण्यासाठी बेस्ट उपाय म्हणजे मीडिया ऑटोमॅटिक डाउनलोड हे ऑप्शन बंद करून टाका. असं केल्याने तुम्ही ज्या फोटो आणि व्हिडिओला डाउनलोड कराल तोच डाउनलोड होईल. ऑटोमॅटिक मीडिया डाउनलोडला तुम्ही सर्व प्रकारचे चॅटला बंद करू शकता. चला तर मग पूर्ण प्रोसेस पाहून घेऊ.
WhatsApp ओपन करा :
1. WhatsApp ओपन केल्यानंतर वरती दिसणाऱ्या तीन डॉट वरती क्लिक करा.
2. त्यानंतर सेटिंग हे ऑप्शन निवडा.
3. त्यानंतर चॅट्सवरती क्लिक करून मीडिया व्हिजीबिलिटी हे ऑप्शन निवडा.
4. आता मीडिया बंद करा.
5. ही सेटिंग फक्त अँड्रॉइड फोनसाठी आहे.
6. तुमच्याकडे आयफोन असेल तर WhatsApp सेटिंगमध्ये जाऊन शेवटी कॅमेरा रोल बंद करा.
7. एखादा खास व्यक्ती किंवा ग्रुप कडून पाठवलेले व्हिडिओ किंवा फोटोला ऑटोमॅटिक डाउनलोड होऊन द्यायचे नसेल तर व्हाट्सअप ओपन करून त्या चॅटमध्ये जा. त्यानंतर व्ह्यू कॉन्टॅक्ट/ ग्रुप इन्फॉर्मेशन वरती क्लिक करून मीडिया व्हिजीबिलिटी बंद करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.