Tech News: तुमचा मोबाईल हॅक झाल्यास देतो काही सिग्नल्स, ते कसे ओळखाल?

Tech News: तुम्हाला अनेक अकाउंट लॉगिनचे मेसेज वारंवार येत असतील तरी तुमचा फोन हॅकिंगचा बळी ठरू शकतो.
Cyber Crime
Cyber CrimeSaamTv
Published On

मुंबई : अलीकडच्या काळात सायबर क्राईमच्या (Cyber Crime) घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सायबर गुन्हेगार आणि हॅकर्स लोकांचे मोबाईल अनेक प्रकारे हॅक करतात. कधी व्हायरसच्या माध्यमातून तर कधी अन्य मार्गाने ते यूजर्सच्या मोबाईलमध्ये घुसतात.

अनेकवेळा युजर्सना आपला मोबाईल हॅक झाल्याचेही कळत नाही. तर हॅकर्स आणि गुन्हेगार यूजर्सचा पर्सनल डेटा चोरतात आणि बँक खाती रिकामे करतात. अनेक वेळा ते यूजर्सना ब्लॅकमेल करतात आणि पर्सनल डेटा लीक करण्याची धमकी देऊन पैसे उकळतात. मात्र, तुम्ही काही गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यास तुमचा मोबाईल हॅक झाला आहे की नाही हे कळू शकते.

Cyber Crime
Cigarette : कागद किंवा ई-सिगारेट, 'या' दोन सिगारेटांपैकी कोणती आहे सर्वाधिक धोकादायक

जेव्हा हॅकर्स तुमच्या फोनमध्ये प्रवेश करतात म्हणजेच फोन हॅक करतात, तेव्हा फोनमध्ये काही सिग्नल मिळू लागतात. ही चिन्हे ओळखून तुम्ही हॅकिंग सहज ओळखू शकता. तुमचा फोन हॅक झाला आहे की नाही हे कसे ओळखायचे ते जाणून घ्या. (Latest News )

अचानक मोबाईल स्लो होणे किंवा हँग होणे

जेव्हा फोनमध्ये मॅलवेअर असतो तेव्हा अनेक वेळा असे होते की तुमचा फोन जो आतापर्यंत चांगला चालत होता तो अचानक स्लो होतो. अशा परिस्थितीत युजर्स म्हणतात की त्यांचा स्मार्टफोन हँग झाला आहे, परंतु हे केवळ हॅंग झाल्यामुळेच नाही तर हॅकिंगमुळेही होते. वारंवार मोबाईल स्क्रीन फ्रीज होणे आणि फोन क्रॅश होणे ही देखील हॅकिंगची सामान्य चिन्हे आहेत.

मोबाइल सेन्सर आणि बॅटरी

तुमच्या फोनमध्ये मॅलवेअर किंवा फसवणूक करणारे अॅप असल्यास, तुमच्या मोबाइलची बॅटरी झपाट्याने संपणे हे देखील हॅकिंगचे लक्षण असू शकते. फोनची बॅटरी अधिक वेगाने संपेल कारण स्क्रीन बंद असतानाही हे अॅप्स काम करत राहतात आणि तुमचा डेटा चोरत असतात. त्याच वेळी, काही प्रकरणांमध्ये, मोबाइलचे सेन्सर पुन्हा पुन्हा डिटेक्ट होऊ लागतात. हे देखील मोबाईल हॅक होण्याचं चिन्ह आहे.

Cyber Crime
Plane crash : टांझानियात मोठी विमान दुर्घटना; प्रवाशांसह विमान तलावात कोसळलं, बचाव कार्य सुरू

तुम्हाला अनेक अकाउंट लॉगिनचे मेसेज वारंवार येत असतील तरी तुमचा फोन हॅकिंगचा बळी ठरू शकतो. अशा परिस्थितीत, आपले सोशल मीडिया खाते त्वरित तपासा. जर तुम्हाला संशयास्पद लॉगिनची माहिती मिळाली तर समजा की कोणीतरी फोन हॅक केला आहे.

अज्ञात कॉल आणि एसएमएस

अनेक वेळा हॅकर्स ट्रोजन मेसेजद्वारे युजर्सचे मोबाईल ट्रॅप करतात. याशिवाय हॅकर्स तुमच्या जवळच्या व्यक्तीचा फोनही हॅक करू शकतात, ज्यामुळे तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही एसएमएसमध्ये येणाऱ्या लिंकवर क्लिक करताना पडताळणी करा.https://www.youtube.com/watch?v=dRLc9lxh3Xs

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com