Plane crash : टांझानियात मोठी विमान दुर्घटना; प्रवाशांसह विमान तलावात कोसळलं, बचाव कार्य सुरू

टांझानियात रविवारी विमान तलावात कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या विमानात ४९ प्रवाशी होते.
Plane crash
Plane crashsaam tv

Tanzania plane crash : टांझानियात रविवारी विमान तलावात कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या विमानात ४९ प्रवाशी होते. या दुर्घटनेतील २३ प्रवाशांना रेस्क्यू करण्यात आले आहे. या दुर्घटनेतील प्रवाशांचे बचाव कार्य सुरूच आहे.

Plane crash
Twitter News: भारतीय CEOला नारळ दिल्यानंतर एलन मस्कने भारतातील सर्वच 250 कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता

एका वृत्तानुसार, टांझानियातील विक्टोरिया तलावात विमान (Plane) कोसळण्याची दुर्घटना घडली. या विमान दुर्घटनेतील २३ प्रवाशांचा बचाव करण्यात आला आहे. या विमान दुर्घटनेत ४९ विमान प्रवाशी प्रवास करत होते. या दु्र्घटनेतील २३ प्रवाशांचे प्राण वाचविण्यात बचाव पथकाला यश आले आहे.

टांझनियाच्या पोलिसांच्या माहितीनुसार, ४९ प्रवाशांचे विमान हे खराब हवामानामुळे रविवारी सदर दुर्घटना घडली. सदर विमान थेट व्हिक्टोरिया तलावात कोसळले. दुर्घटनाग्रस्त विमान हे उत्तर पश्चिम येथील बुकोबा शहरात लँड होणार होते. याच दरम्यान विमान दुर्घटनेची (Accident) घटना घडली आहे. या दुर्घटनेतील प्रवाशांचे जीव वाचविण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Plane crash
Lizard Video: सरडा आणि माणसाची घनिष्ठ मैत्री पाहून हैराण व्हाल; सरड्यासोबत तरुण करतो 'या' गोष्टी...

बचाव कार्यासाठी पथक रुजू

टांझानियातील विमान दुर्घटनेबाबत ट्विट करत एका स्थानिक बीएनओ न्यूज वेबसाईटने या दुर्घटनेबाबत व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये विमान तलावात बुडताना दिसत आहे. तलावात बोटीतून सुरक्षा दलाचे पथकाचे बचाव कार्य सुरू आहे. ज्या लोकांचा बचाव पथकाने जीव वाचविला आहे, ते लोक किनाऱ्यावर उभे दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com