Elon Musk Latest News: स्पेस एक्स, टेस्ला आणि आता ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून अनेक बदलांचा सपाटा लावला आहे. ट्विटरची मालकी मिळाल्यानंतर मस्क यांनी हातात वॉशबेसिंग घेत ट्विटरच्या (Twitter) कार्यालयात जोरदार एन्ट्री केली होती. त्यांनंतर आल्या-आल्या त्यांनी ट्विटरचे भारतीय सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक उच्चपदस्थ कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला होता.
मस्क (Elon Musk) यांचा आक्रमकपणा पाहता ट्विटरमधील जवळपास 50% टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. याचा फटका ट्विटरच्या भारतातील कर्मचाऱ्यांनाही बसला आहे. मस्कने भारतातल्या जवळपास सर्वच 250 कर्मचाऱ्यांना कामावरून तडकाफडकीपणे काढून टाकले आहे. (Twitter Fires All Indian Employees)
एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, ट्विटर कंपनीचे भारतात जवळपास 250 कर्मचारी होते. कंपनीने कर्मचाऱ्यांना मेल पाठवून कळवले होते की, शुक्रवारी अनेकांनी कामावरून कमी करण्यात येईल. त्यानुसार भारतात कर्मचाऱ्यांची छाटणी सुरू करण्यात आली आहे. एलन मस्कने नुकतेच ट्विटर विकत घेतले. मस्क ट्विटरचा मालक होताच, मस्कने प्रथम भारतीय वंशाचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह कंपनीच्या चार बड्या अधिकाऱ्यांना कामावरुन काढून टाकले.
यानंतर ट्विटरमधून मोठ्या प्रमाणावर बडतर्फी केली जाईल, असे मानले जात होते. ट्विटरने कर्मचार्यांना पाठवलेल्या मेलमध्ये असे म्हटले आहे की, ट्विटरला एका निरोगी मार्गावर नेण्यासाठी, आपण शुक्रवारी जागतिक कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याच्या कठीण प्रक्रियेतून जाणार आहोत.
इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, भारतातील जवळपास संपूर्ण कर्मचारी कामावरून काढून टाकण्यात आले आहेत. संपूर्ण क्युरेशन टीम काढून टाकण्यात आली आहे. ही टीम ट्विटर मोमेंट्स फीचरसाठी कंटेंट तयार करत होती. याशिवाय, संप्रेषण, जागतिक सामग्री भागीदारी, विक्री आणि जाहिरात महसूल, अभियांत्रिकी आणि उत्पादन या टीम्सना देखील फटका बसला आहे. एका सूत्राने सांगितले की या ट्विटरच्या स्टाफमधील संपूर्ण किंवा 50 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. काही कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आल्याचेही ट्विटरवरून काढून टाकण्यात आलेल्या एका कर्मचाऱ्याने सांगितले.
हे लोक कंपनीच्या पूर्णवेळ कर्मचारी नव्हते. कंपनीच्या पब्लिक पॉलिसी टीममध्ये असलेले यश अग्रवाल यांनी ट्विट केले की, "फक्त नोकरीवरून काढले. या टीमचा आणि या ट्विटरच्या संस्कृतीचा एक भाग असल्याचा मला अभिमान आहे. या टीमचा आणि या संस्थेचा एक भाग असणे हा सन्मान आहे. ट्विटरमधील बडतर्फीची ही पहिली फेरी आहे. डिसेंबर २०२१ मध्ये ट्विटरचे जगभरात ७,५०० कर्मचारी होते.
यापूर्वी ट्विटरवरून कर्मचाऱ्यांना एक मेल पाठवण्यात आला होता. ट्विटरला निरोगी मार्गावर नेण्यासाठी आम्ही शुक्रवारी आपले जागतिक कर्मचारी कमी करण्याच्या कठीण प्रक्रियेतून जाऊ, असे त्यात लिहिले होते. ट्विटरवर महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होईल, परंतु दुर्दैवाने ट्विटरला यशाच्या मार्गावर नेण्यासाठी हे पाऊल आवश्यक आहे.
मेलमध्ये पुढे लिहिले होते की, तुम्ही स्पॅम फोल्डरसह तुमचा मेल तपासा. तुमच्या नोकरीवर परिणाम होत नसल्यास, तुम्हाला तुमच्या Twitter ई-मेलद्वारे सूचना मिळेल. तुमच्या नोकरीवर परिणाम झाल्यास, तुम्हाला तुमच्या वैयक्तिक ई-मेलवर पुढील चरणासाठी सूचना मिळेल. तुम्हाला twitter-hr@ वरून शुक्रवारी संध्याकाळी 5PM PST पर्यंत कोणताही मेल न मिळाल्यास, peoplequestions@twitter.com वर मेल करा.'
मेलमध्ये पुढे लिहिले आहे की, 'ट्विटर सिस्टम, ग्राहकांचा डेटा आणि प्रत्येक कर्मचाऱ्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ट्विटरचे कार्यालय तात्पुरते बंद केले जाईल. तसेच सर्व बॅज निलंबित करण्यात आले आहेत. तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा ऑफिसला जात असाल तर कृपया घरी परत जा. आम्हाला माहित आहे की हे प्रत्येकासाठी आव्हानात्मक असणार आहे, तुमच्या नोकरीवर परिणाम होत आहे किंवा नाही.
मस्क या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने गेल्या आठवड्यात ट्विटर विकत घेण्यासाठी 44 अब्ज डॉलरचा करार पूर्ण केला. कंपनीची मालकी हाती येताच मस्कने संपूर्ण ट्विटर बोर्ड विसर्जित करून त्याने पूर्णपणे कमांड आपल्या ताब्यात घेतली. तेव्हापासून कंपनीत मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.