Delhi Air Pollution: देशाच्या राजधानीचा श्वास गुदमरला; विषारी हवेमुळे दिल्लीत आरोग्य आणीबाणी

Delhi Air Pollution News: रेल्वे, संरक्षण आणि मेट्रोची बांधकामं वगळता इतर सर्व बांधकामं पुढील आदेश येईपर्यंत थांबवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
Delhi Air Pollution News
Delhi Air Pollution News Twitter/@ANI
Published On

शिवाजी काळे, नवी दिल्ली

Delhi Air Pollution News: देशाची राजधानी दिल्ली गुदमरत आहे. दिल्लीतील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळली आहे, ज्यामुळे दिल्लीकरांना श्वास घेण्यासही त्रास होतो. अशा परिस्थितीत दिल्ली सरकारने दिल्लीमध्ये आरोग्य आणीबाणी जाहीरे केली आहे. सिस्टम ऑफ एयर क्वालिटी एंड वेदर फोरकास्टिंग एंड रिसर्च (SAFAR) च्या माहितीनुसार आज, शनिवारी राजधानी दिल्लीतील एयर क्वालिटी इंडेक्स (AQI) म्हणजेच हवेची गुणवत्ता ही 431 एवढ्या घातक स्तरावर पोहोचली आहे. (Delhi Air Quality Index Today)

Delhi Air Pollution News
Ejaz Lakdawala News: एक मच्छर आदमी को...; गॅंगस्टर एजाज लकडावालाने मेलेल्या डासांची बाटली थेट कोर्टात आणली

दिल्लीत शाळा बंद

दरवर्षीप्रमाणे पंजाब आणि हरियाणा या दिल्लीशेजारील राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी पराली जाळण्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळं राजधानी दिल्ली इथं हवेचं (Delhi Air Pollution) प्रदूषण घातक पातळीवर पोहोचले आहे. दिल्ली सरकारने तातडीने पावलं उचलत डिझेलवरील गाड्यांवर राजधानी दिल्लीच येण्यास प्रवेश बंद केला आहे.

शुक्रवारीच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावर दिल्लीतील प्राथमिक शाळा शनिवारपासून बंद ठेवण्याची घोषणा केली होती. यासोबतच इयत्ता पाचवीच्या वरच्या सर्व वर्गांसाठी मैदानी उपक्रमही बंद करण्यात आले आहेत.

बांधकामं थांबवण्याचे आदेश

सिस्टम ऑफ एयर क्वालिटी अॅन्ड वेदर फोरकास्टिंग एंड रिसर्च (SAFAR) च्या माहितीनुसार आज, शनिवारी राजधानी दिल्लीतील एयर क्वालिटी इंडेक्स (AQI) 431 (स्तरावर) पोहोचला आहे. नोएडा इथला AQI 529, तर गुरूग्राम इथला AQI 478 वर पोहोचला आहे. AQI हे हवेची गुणवत्तेचं मापन करणारं एकक आहे.

450 AQI असणं मानवी आरोग्यासाठी अत्यंत वाईट मानलं जातं. राजधानी दिल्ली इथं वाढलेल्या प्रदूषणामुळे सरकारने तातडीने पावलं उचलली आहेत. रेल्वे, संरक्षण आणि मेट्रोची बांधकामं वगळता इतर सर्व बांधकामं पुढील आदेश येईपर्यंत थांबवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

Delhi Air Pollution News
Nandubar : भरधाव ट्रकचे अचानक ब्रेक फेल, थेट ५० फूट दरीत कोसळला, चालकाचा जागीच मृत्यू

वाहनांवर ही बंदी येणार…?

दिल्लीतील हवा प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीतील BS III पेट्रोल आणि BS IV डिझेल या वाहनांवर अति आवश्यक सेवा वगळता काही काळासाठी बंधनं टाकण्यात आली आहेत. हवेतील प्रदुषणामुळे नोएडा येथील इयत्ता ८ वी पर्यंतच्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. राजधानी दिल्ली येथे प्राथमिक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. दिल्ली सरकारने ५० टक्के कर्मचाऱ्यांना घरुन काम (Work From Home) करण्यास सांगितलं आहे.

एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे हवेच्या गुणवत्तेचं प्रमाण कसं ओळखावं?

एअर क्वालिटी इंडेक्स 0 ते 50: उत्तम हवा

एअर क्वालिटी इंडेक्स 51 ते 100: चांगली हवा

एअर क्वालिटी इंडेक्सः 101 ते 200 मध्यम हवा

एअर क्वालिटी इंडेक्स 201 ते 300 दरम्यानः खराब हवामान

एअर क्वालिटी इंडेक्स 301 ते 400 दरम्यानः हवा अत्यंत खराब

एअर क्वालिटी इंडेक्स 400 ते 500 च्या वरः मानवी आरोग्यास हानिकारक

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com