Cervical spondylosis saam tv
लाईफस्टाईल

Cervical spondylosis: ३०-४५ वयोगटातील २० टक्के व्यक्तींच्या पाठीच्या कण्याला येते सूज; आजच सोडा 'या' ३ वाईट सवयी

Cervical spondylosis: सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस हा एक जीवनशैलीचा आजार आहे. ही समस्या स्पाईनचा सर्वात वरच्या भाग सर्व्हायकल स्पाईनमध्ये उद्भवते. २०% तरुण प्रौढांना बैठी जीवनशैली, शारीरीक हलचालींचा अभाव आणि चुकीच्या पध्दतीने बसणं आणि झोपल्याने मणक्याच्या विकाराने ग्रासले आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस हा एक गंभीर आजार आहे ज्यामध्ये पाठीच्या कण्याला सूज येते. ही समस्या प्रामुख्याने मानेच्या मणक्याला प्रभावित करते. सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस हा एक जीवनशैलीचा आजार आहे. ही समस्या स्पाईनचा सर्वात वरच्या भाग सर्व्हायकल स्पाईनमध्ये उद्भवते. म्हणूनच याला सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस म्हणतात.

तरूणांमध्ये वाढतेय समस्या

२०% तरुण प्रौढांना बैठी जीवनशैली, शारीरीक हालचालींचा अभाव आणि चुकीच्या पध्दतीने बसणं आणि झोपल्याने मणक्याच्या विकाराने ग्रासले आहे. मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये घालवलेले तास, वाढता स्क्रीन टाइम आणि बसण्याच्या चुकीच्या स्थिती हे याचे प्रमुख कारण ठरत आहे.

सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस हा मानेच्या मणक्यांच्या घर्षणामुळे निर्माण होतो. या परिस्थितीत हाडं आणि कुर्चा यांच्यामध्ये बिघाड होतो. परिणाम असं झाल्याने मानेमध्ये अत्यंत वेदना होऊ लागतात. असतात या चुकीच्या शारीरीक स्थितीमुळे आजूबाजूच्या नसा देखील दाबल्या जाऊ शकतात, ज्यामुळे सतत वेदना होतात आणि स्नायूंमध्ये कडकपणा येतो. मानदुखी, संवेदनशीलता, तीव्र वेदना आणि अस्वस्थता ही याची लक्षणे आहेत. जर वेळीच उपचार केले नाही तर यामुळे दीर्घकाळात शारीरीक हालचालींसंबंधी समस्या उद्भवू शकतात आणि जीवनाची गुणवत्ता देखील कमी होऊ शकते.

अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील स्पाइन सर्जन डॉ. मोहित मुथा म्हणाले यांच्या सांगण्यानुसार, एकाच स्थितीत बसून जास्त वेळ काम केल्यामुळे ३०-४५ वयोगटातील तरुणांमध्ये सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिसच्या प्रमाणात सुमारे २० टक्क्यांनी वाढ झालीये. ज्यामुळे मणक्यावर जास्त ताण येतो. चुकीच्या शारीरीक स्थितीत जास्त वेळ बसल्याने पाठीचे स्नायू कमकुवत होतात आणि मणक्‍याची झीज होऊ लागल्यानंतर मणक्‍यामध्ये रचनात्मक बदल होऊ लागतात ज्यामुळे तेथील सांध्यांना सूज येणे, स्नायू कडक होणे, शिरा कडक होणे,शिरांवर दाब पडणे अशा समस्या उद्भवतात.

डॉ. मुथा पुढे म्हणाले की, योग्य शारीरीक हालचालीशिवाय तासनतास स्वयंपाकघरात काम करणे, दीर्घकाळ उभं राहणं हे देखील पाठीच्या कण्यावर ताण निर्माण करू शकते. नियमित स्ट्रेचिंगचा अभाव, चुकीची शारीरीक स्थिती आणि बैठी जीवनशैली ही समस्येला आणखी वाढवत आहे. दररोज, १० पैकी ५ लोक मानेच्या दुखण्याची तक्रार करतात आणि खराब शारीरीक स्थितीमुळे स्नायू कडक होतात आणि त्यांना ही स्थिती आढळून येते. या जोखमींबद्दल जागरूक रहा आणि स्थिती बिघडण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाय करा.

३० ते ४० वयोगटातील व्यक्तींना जाणवतेय समस्या

लीलावती रुग्णालयातील स्पाइन सर्जन डॉ. समीर रूपारेल म्हणाले की, तरुणांमध्ये मणक्याच्या समस्या वाढत आहेत आणि त्यात १५% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. ३० ते ४० वयोगटातील तरुणांना कामाच्या ठिकाणी तासनतास बसून किंवा जास्त वेळ उभे राहिल्याने सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिसच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. दर महिन्याला, मला भेट देणाऱ्या १० पैकी २ ते ३ व्यक्तींना पाठदुखी आणि मानेच्या वेदना सतावतात. त्यांना सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिसचा त्रास होतो. दीर्घकालीन मणक्याच्या समस्या टाळण्यासाठी दररोज व्यायाम करणे, नियमितपणे स्ट्रेचिंग करणे आणि योग्य पोश्चर राखणे गरजेचे आहे.

डॉ. मुथा पुढे यांनी माहिती दिली की, ही स्थिती टाळण्यासाठी आणि पाठीचा कणा निरोगी ठेवण्यासाठी, दररोज व्यायाम करा, स्ट्रेचिंग करा, जास्त वेळ बसून राहणे किंवा उभे राहणे टाळा, वारंवार ब्रेक घ्या, चालणे, वजन नियंत्रित राखणं स्वयंपाकघरात जास्त वेळ उभे राहणे टाळा आणि पाठीच्या कण्याला योग्य आधार देण्यासाठी कामाच्या ठिकाणी किंवा घरी योग्य खुर्ची व टेबलचा वापर करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT