Manasvi Choudhary
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत स्वतःला फिट ठेवण्यासाठी योगासने हा सर्वात उत्तम निरोगी आरोग्याचा मंत्र आहे.
शरीर लवचिक आणि मन शांत ठेवण्यासाठी खालील ४ योगासने दररोज करणे अत्यंत फायदेशीर आहे.
सूर्यनमस्कार हा एक संपूर्ण योगाभ्यास मानला जातो. जो संपूर्ण शरीराच्या स्नायूंवर काम करतो. यात एकूण १२ स्टेप्स आहेत. ज्यामुळे शरीर लवचिक बनते आणि कॅलरीज बर्न करण्यास मदत होते.
कपालभाती केवळ पोटाची चरबी कमी करत नाही तर पचनसंस्थेला देखील सुधारण्यास मदत करतं. ते शरीरातील घाण काढून टाकतं आणि चयापचय गतिमान करतं.
अधोमुख श्वानासन या आसनात शरीराचा आकार उलट्या 'V' सारखा होतो यामुळे हातापायांचे स्नायू मजबूत होतात आणि मेंदूकडे रक्ताचा पुरवठा वाढतो.
सरळ उभे राहून दोन्ही हात वर करून टाचा वर उचलणे म्हणजे ताडासन हे आसन केल्याने पाठीच्या कण्याला बळकटी देते आणि शरीराचा तोल सुधारते
हिवाळ्यात योगा करण्याची वेळ तुमच्या शारीरिक हालचालीवर आणि हवामानावर अवलंबून असते.
हिवाळ्यात योगा करण्यासाठी सकाळची वेळ सर्वोत्तम मानली जाते. तसेच दुपारच्या वेळेत देखील तुम्ही हिवाळ्यात व्यायाम करू शकता.