Manasvi Choudhary
शेपूची भाजी हिवाळ्यात खाल्ली जाते. शेपूची भाजी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
शेपू बटाटा भाजी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच सहजरित्या शेपूची भाजी बनवू शकता.
शेपूची भाजी बनवण्यासाठी शेपू, बटाटे, हिरवी मिरची, लसूण, मुगाची डाळ, तेल, हळद, मीठ हे साहित्य एकत्र करा
सर्वात शेपूची भाजी स्वच्छ निवडून घ्या. गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये लसूण ठेचून टाका. लसूण परतल्यानंतर त्यात हिरवी मिरची आणि हळद मिक्स करा.
यामध्ये नंतर बटाटाच्या फोडी मिक्स करा आणि थोडे मीठ घाला. बटाटे चांगले शिजवून घ्या.
बटाटे थोडे मऊ झाले की त्यात बारीक चिरलेला शेपू आणि भिजवलेली मुगाची डाळ घाला
सर्व मिश्रण नीट एकत्र करून पुन्हा त्यावर झाकण ठेवा. शेपूची भाजी वाफेवर शिजवून घ्या
भाजीतील पाणी पूर्ण आटले आणि बटाटा मऊ झाला की गॅस बंद करा अशाप्रकारे शेपू बटाटा भाजी सर्व्हसाठी तयार होईल.