Manasvi Choudhary
हिवाळ्यात सुपरफूड म्हणून गाजर खाल्ला जातो. तुम्ही देखील गाजरच्या अनेक रेसिपी घरी ट्राय करू शकता.
गाजरमधील व्हिटॅमिन 'सी' आणि अँटी-ऑक्सिडंट्स यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत होते.
हिवाळ्यात गाजरपासून तुम्ही विविध प्रकारचे पदार्थ बनवू शकता. या आहेत काही सोप्या रेसिपी
गाजर किसून त्यामध्ये दूध , साखर आणि वेलची पावडर मिक्स करून गाजरचा हलवा करा.
जर तुम्हाला गाजरचा हलवा खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही गाजरची खीर बनवू शकता.
तुम्ही गाजर हलवा थोडा घट्ट करू त्याची बर्फी तयार करू शकता. कोणत्याही कार्यक्रमात स्वीट म्हणून हा पदार्थ तयार करा.
दही किसलेला गाजर, हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबू रस या साहित्यापासून गाजरची कोशिंबीर तयार करा.
गव्हाच्या पिठात किंवा भाजणीच्या पिठात किसलेले गाजर, आलं-लसूण पेस्ट, तिखट आणि मीठ घालून खरपूस पराठे किंवा थालीपीठ बनवा.