Manasvi Choudhary
हिवाळा सुरू झाला की बाजारात हिरवेगार आणि गोड मटार विक्रीसाठी येतात मटार केवळ चविष्ट नसून ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
आता तुम्ही थंडीत नवऱ्यासाठी खास मटारचे चविष्ट 5 पदार्थ बनवू शकता. नवरा तुमचे कौतुक करेल.
खास नवऱ्यासाठी तुम्ही चटपटीत नाश्ता म्हणून मटार कबाब बनवू शकता. बटाटा, आलं पेस्ट, हिरवी मिरची आणि ब्रेड यापासून ही रेसिपी तयार होईल.
मटार कचोरी हिरवी पुदीना चटणीसोबत भारी लागते. हिरवे मटार, हिरवी मिरची, आले आणि लसूण या मिश्रणापासून तुम्ही खास मटार कचोरी बनवू शकता.
थंडीच्या संध्याकाळी शरीराला ऊब देण्यासाठी मटारचे सूप बेस्ट आहे. मटार, कांदा आणि थोडे लसूण पाण्यात उकळून मिक्सरला बारीक करून ते कढईत बटर मध्ये उकळून घ्या.
मटार उकडून ते स्मॅश करा. त्यात चिरलेली कोथिंबीर, गरम मसाला आणि आमचूर पावडर मिक्स करून तुम्ही खास मटार पराठा बनवू शकता.
कोथिंबीर वडीप्रमाणेच मटारची वडी सुद्धा खूप चविष्ट लागते. वाटलेले मटार, बेसन, तांदळाचे पीठ आणि मसाल्यांचे मिश्रण करून ते वाफवून तुम्ही पॅनवर फ्राय करा.