Surabhi Jayashree Jagdish
लिवर म्हणजेच यकृत हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा भाग असून शरीरातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करून काढून टाकण्याचं काम या अवयवाद्वारे होतं.
यकृत खराब होतं तेव्हा शरीरात काही लक्षणं दिसून येतात. यामध्ये काही लक्षणं ही रात्रीच्या वेळेस दिसून येतात.
ही लक्षणं वेळीच ओळखली गेली तर यकृत खराब होण्यापासून वाचवता येतं. ही लक्षणं काय आहेत ते जाणून घेऊया
रात्री मळमळ आणि उलट्या सारखी लक्षणं जाणवली तर ते यकृताच्या नुकसानीचं लक्षण असू शकतं.
जर तुम्हाला लघवीचा रंग बदलल्याचं जाणवत असेल तर ते यकृताच्या समस्येचं लक्षण असू शकतं.
यकृत खराब होत असेल तर पाय आणि घोट्यांमध्ये सूज येण्याची शक्यता वाढते.
तुम्हाला रात्री झोपल्यानंतर सतत जाग येत असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या.
याठिकाणी देण्यात आलेल्या गोष्टी सामान्य माहितीवर आधारित आहेत. आम्ही याची खातरजमा करत नाही