Surabhi Jayashree Jagdish
कॅन्सर म्हणजे शरीरातील पेशींची असामान्य वाढ होय. या पेशी शरीराच्या कोणत्याही भागात वाढू शकतात आणि पसरू शकतात
सामान्यतः पेशी वाढतात आणि नवीन पेशी तयार करण्यासाठी मल्टीप्लाय होतात.
जेव्हा काही पेशी जुन्या आणि कमकुवत होतात तेव्हा त्या मरतात आणि नवीन पेशी तयार होतात.
पण काही वेळा शरीरात खराब आणि असामान्य पेशी वाढू लागतात. या खराब पेशी वाढतात आणि त्याचं गाठींमध्ये रूपांतर होतं.
हा ट्यूमर कॅन्सरस किंवा कॅन्सर नसलेला असू शकतो. कर्करोगाच्या ट्यूमरमुळे आसपासच्या ऊतींचे नुकसान होतं आणि त्या संपूर्ण शरीरात पसरतात.
यामुळे शरीरात नवीन ट्यूमर तयार होण्याचा धोका वाढतो तर काही ट्यूमर पसरू शकत नाहीत.