Peanut Paratha Saam TV
लाईफस्टाईल

Peanut Paratha: लहान मुलांना डब्ब्याला द्या शेंगदाणा पोळी; जाणून घ्या सिंपल रेसिपी

Recipe: मुलांना रोज उठून टिफीनसाठी काय नवीन बनवावे असा प्रश्न प्रत्येक आईला पडतो. त्यामुळे लहान मुलांच्या टिफीनसाठी आणि तुम्हाला देखील नाश्त्यासाठी आवडेल अशी एक सेसिपी आज पाहणार आहोत.

साम टिव्ही ब्युरो

Peanut Paratha Recipe:

थंडीच्या दिवसात अनेक व्यक्ती उर्जा मिळणारे आणि गरम पदार्थांचे जास्तीत जास्त सेवन करतात. अनेक व्यक्ती या दिवसांत तिळ, शेंगदाणे, बाजरी, खजूर, अंडी, हरभरा असे पदार्थ खातात. लहान मुलांना असे पदार्थ दिले तर ते खात नाहीत. मात्र उर्जा मिळावी म्हणून प्रत्येक आई आपल्या मुलांना जबरदस्तीने हे पदार्थ खाऊ घालते.

लहान मुलांना शाळेमध्ये देखील सकस आहार असलेले पदार्थ टिफीनला द्या असे सांगितले जाते. अशात लहान मुलांना रोज उठून टिफीनसाठी काय नवीन बनवावे असा प्रश्न प्रत्येक आईला पडतो. त्यामुळे लहान मुलांच्या टिफीनसाठी आणि तुम्हाला देखील नाश्त्यासाठी आवडेल अशी एक सेसिपी आज पाहणार आहोत.

शेंगदाणे आपण बऱ्याच पदार्थांमध्ये वापरतो. पोहे, साबुदाणा खिचडी आणि बऱ्याच पालेभाजी, कडधान्यांची भाजी बनवताना यात शेंगदाण्याचा कुट वापरला जातो. अशात शेंगदाण्याची पोळी देखील बनवता येते हे तुम्हाला मिहीत आहे का? साखर पोळी सर्वांनीच खाल्ली असेल तशीच आता शेंगदाणा पोळी कशी बनवायची हे आज जाणून घेऊ.

साहित्य

  • शेंगदाणे

  • तीळ

  • गुळ

  • गव्हाचं पिठ

  • मिठ

  • तेल

  • तूप

कृती

शेंगदाणा पोळी बनवताना सर्वात आधी शेंगदाणे तव्यावर भाजून घ्या. त्यानंतर ते पाखडून त्याची भरड करून घ्या. त्यात एक थोडे तिळ भाजून मिक्स करा. गुळाचा ओलसर पाक करून त्यात थोडं तूप घाला. त्यानंतर तयार शेंगदाणे आणि तिळ यात मिक्स करा. हे मिश्रम थंड झाल्यावर गव्हाच्या पिठाची कणीक मळून घ्या.

पुढे पुरणपोळीमध्ये जशी बनवतात तशा पद्धातीने पिठाचा गोळा घ्या आणि त्यात तयार शेंगदाणाचं मिश्रण भरा. यची सुंदर पोळी लाटून घ्या आणि तव्यावर शॅलो फ्राय करा. या पोळीला शेंगाची पोळी सुद्धा म्हणतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खिशात पैसा टिकणार, व्यवसायात नफा होणार; 5 राशींच्या लोकांसाठी शनिवार गेमचेंजर ठरणार

Onion: व्यापाऱ्यांचा कांदा खरेदीस नकार, कांदा उत्पादकांचं टेन्शन वाढलं

Diesel Crisis: 7/12 शिवाय डिझेल नाही, सरकारची जाचक अट; शेतकऱ्यांचा संताप

Imran Khan: इम्रान खानची पत्नी रिलेशनशिपमध्ये, जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत बांधणार लग्नगाठ

Fact Check : आता सर्वांना मिळणार 7500 रुपये पेंशन? सरकारकडून निवृत्तीवेतनात भरमसाठ वाढ?

SCROLL FOR NEXT