Healthy Breakfast Recipe : ब्रेकफास्टमध्ये ट्राय करा पौष्टिक आणि हेल्दी मक्याची इडली, झटपट बनेल; पाहा रेसिपी

How To Make Corn Idli : इडली म्हटलं की, आपल्याला अण्णाची आठवण हमखास येते. साउथ इंडियनचा हा पदार्थ शरीरासाठी अधिक हेल्दी आणि पौष्टिक मानला जातो. हिवाळा म्हटलं की, अनेक हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांची चव चाखली जाते.
Healthy Breakfast Recipe
Healthy Breakfast Recipe Saam Tv
Published On

Corn Idli Recipe :

इडली म्हटलं की, आपल्याला अण्णाची आठवण हमखास येते. साउथ इंडियनचा हा पदार्थ शरीरासाठी अधिक हेल्दी आणि पौष्टिक मानला जातो. हिवाळा म्हटलं की, अनेक हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांची चव चाखली जाते. या काळात मक्के दी रोटी आणि सरसो का साग याचे कॉम्बिनेशन पाहायला मिळते. यामध्ये अधिक पोषक तत्व असतात जे शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात.

हिवाळ्यात मका आपल्याला अधिक प्रमाणात पाहायला मिळतो. इडली हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. पण इडली बनवताना फार मेहनत देखील घ्यावी लागते. जर तुम्हाला देखील इडलीची वेगळ्या पद्धतीने चव चाखायची असेल तर तुम्ही मक्याची इडली ट्राय करु शकता. पाहूया रेसिपी (Recipes)

1. साहित्य

  • कॉर्न फ्लोअर - २ वाट्या

  • उडदाची डाळ - १ टेबलस्पून

  • चण्याची डाळ - १ टेबलस्पून

  • दही - अर्धी वाटी

  • जिरे - १ टीस्पून

  • हिरवी मिरची - २ बारीक चिरलेली

  • आले - १

  • मोहरी - १ टीस्पून

  • कढीपत्ता - ५ ते ६

  • कोथिंबीर - २ चमचे

  • इनो - १ टीस्पून

  • तेल (Oil) - १ टीस्पून

  • चवीनुसार मीठ

Healthy Breakfast Recipe
Masala Chai Recipe : घरच्या घरी बनवा परफेक्ट मसाला चहा, हिवाळ्यात राहाल अधिक तंदुरुस्त; रेसिपी एकादा पाहाच

2. कृती

  • सर्वप्रथम तव्यावर २ चमचे तेल घालून गरम करा. त्यात मोहरीची फोडणी द्या.

  • नंतर त्यात चनाडाळ आणि उडिद डाळ लालसरहोईपर्यंत भाजून घ्या.

  • त्यात आले, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून भाजून घ्या. त्यामध्ये मक्याचे पीठ घालून भाजून घ्या.

  • भाजलेले मिश्रण दुसऱ्या भांड्यात घेऊन त्यात मीठ, दही आणि कोथिंबीर एकत्र करुन पाणी घाला. तांदळ्याच्या इडलीप्रमाणे मिश्रण बनवा.

  • हे मिश्रण चांगल्या प्रकारे ढवळून १० मिनिटे तसेच ठेवा. मिश्रण सेट झाल्यानंतर त्यात इनो घाला.

  • मिश्रण पुन्हा एकदा फेटून घ्या. इडली मिश्रण पात्रात टाका. १५ मिनिटानंतर इडली पात्राबाहेर काढा.

  • तयार होईल हेल्दी आणि पौष्टिक चटपटीत मक्याची झटपट इडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com