Parenting Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Parenting Tips : पालकांनो, मुलांचे ऍडमिशन करण्यापूर्वी या गोष्टींची काळजी घ्या, येणार नाही कोणतीच अडचण

Help To Your Child Adjust New School : खरेतर ऍडमिशनचा हा काळ पालक व मुलांसाठी अधिक त्रासदायक असतो.

कोमल दामुद्रे

Child Education Time : रिजल्ट लागल्यानंतर मुलांना वेध लागतात ते ऍडमिशनचे. खरेतर ऍडमिशनचा हा काळ पालक व मुलांसाठी अधिक त्रासदायक असतो. अशावेळी पालकांना व मुलांना अधिक संघर्ष करावा लागतो.

मुलांच्या करिअरपासून (Career) ते कोणत्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचे. तिथले वातावरण याबाबच्या अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. अशा परिस्थितीत मुलाला नवीन शाळेत घालण्यापूर्वी कोणत्या गोष्टीची काळजी (Care) घेतली पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया, शाळेत जुळवून घेण्यासाठी मुलाला कसे तयार करावे.

1. नवीन बदलांसाठी मुलाला कसे तयार करावे ?

मुलाला शाळेत घेऊन जात असताना तेथील लोकांशी संवाद साधा. त्याच्या शिक्षकांशी व कर्मचाऱ्यांशी ओळख बनवा. तुमच्या मुलांसोबत काही वेळ शाळेत घालवा ज्यामुळे त्यांना शाळेत जाण्याची गोडी (Enjoy) लागेल.

2. शाळेचे संशोधन

मुलांचे ज्या शाळेत ऍडमिशन घेणार आहात त्या शाळेबद्दल व्यवस्थित माहीत घ्या. कोणत्या शाळेत ऍडमिशन घेणार आहात त्या शाळेची यादी तयार करा. तेथील सुविधा, कर्मचारी पात्रता आणि मान्यता असलेल्या गोष्टींची माहीती घ्या. शाळेचे वातावरण कसे आहे हे देखील तपासा.

3. मुलांना शाळेच्या वेळापत्रकात शिफ्ट करा

जर मूल नवीन शाळेत शिफ्ट होत असेल तर काही आठवडे अगोदर मुलाला त्या शाळेच्या वेळापत्रकात शिफ्ट करण्याचा प्रयत्न करा. यामुळे मुलासाठी नवीन दिनचर्या स्वीकारणे सोपे होईल.

4. कर्मचारी आणि इतर मुलांना जाणून घ्या

तुमच्या मुलाला नवीन शाळेत पाठवण्यापूर्वी, कर्मचारी आणि इतर मुलांना भेटण्यासाठी वेळ काढा. हे आपल्या मुलास आरामदायक वाटण्यास आणि नवीन वातावरणाची सवय होण्यास मदत करेल. याशिवाय तेथे शिकणाऱ्या मुलाच्या पालकांशीही संपर्क साधता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Schemes : बचत छोटी नफा मोठा ! महिलांसाठी पोस्ट ऑफिसच्या खास 4 योजना

India Semiconductor Mission : बेंगळुरूमध्ये डिझाइन होणार जगातील सर्वात प्रगत 2nm चिप्स; एआरएमच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन

Bachchu Kadu: शेतकऱ्यांसह बच्चू कडू गेट तोडून जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले|VIDEO

Ashish Damle : परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षाला मंत्रिपदाचा दर्जा; अजित पवार गटाच्या पारड्यात आणखी एक मंत्रिपद

Ashram School : वर्षभरापासून पोल्ट्री फार्ममध्ये भरतेय आश्रम शाळा; १२ कोटीची सुसज्ज शाळेची इमारत पडून

SCROLL FOR NEXT