

सर्व योजना एकाच प्लॅटफॉर्मवर
myScheme पोर्टलवर तुम्हाला मिळणार सर्व योजनांची माहिती
कोणती योजना तुमच्यासाठी महत्त्वाची हे एका क्लिकवर कळणार
सध्याच्या काळात प्रत्येकाने आपल्यासाठी आणि कुटुंबासाठी काहीतरी गुंतवणूक करायला हवी.सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यापैकी कोणती योजना तुमच्यासाठी योग्य आहे तुम्ही कोणत्या योजनेत गुंतवणूक करु शकतात, हे तुम्हाला एका क्लिकवर समजणार आहे. तुम्हाला फक्त तुमची माहिती मिळणार आहे.
तुमच्यासाठी कोणती योजना योग्य आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक, अर्ज कसा करावा याबाबत सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. तुम्हाला myScheme वर सर्व माहिती मिळणार आहे.
काय आहे myScheme पोर्टल? (What is myScheme Portal)
myScheme हा भारत सरकारचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. यावर सर्व सरकारी योजनांची माहिती असते. या वेबसाइटवरुन तुम्ही केंद्र व राज्य सरकारच्या कोणत्या योजनेसाठी पात्र आहात याबाबत सर्व माहिती मिळणार आहे. तुमचे वय, उत्पन्न, लिंग, राज्य या गोष्टींच्या आधारे तुम्हाला ही माहिती मिळणार आहे.
सर्व सरकारी योजना एकाच प्लॅटफॉर्मवर (myScheme Portal Benefits)
या सरकारी प्लॅटफॉर्मवर केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना उपलब्ध आहे. यामध्ये स्कॉलरशिप, किसान योजना, महिला व बालकल्याण विभागाच्या योजना, पेन्शन याबाबत सर्व माहिती पोर्टलवर मिळणार आहे.
तीन सिंपल स्टेप करा फॉलो
सर्वात आधी तुम्हाला myScheme पोर्टलवर जायचे आहे. यानंतर Find Schemes for you वर क्लिक करा.
यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला तुमचे उत्पन्न, राज्य याबाबत माहिती मिळणार आहे.
यामध्ये तुमच्या माहितीनुसार स्कीम स्क्रिनवर दिसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.