Shruti Vilas Kadam
कच्च्या पालकामध्ये व्हिटॅमिन C, फोलेट आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. तर शिजवलेल्या पालकामध्ये लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम अधिक प्रभावीपणे शरीरात शोषले जातात.
शिजवलेले पालक खाल्ल्यास त्यातील लोह शरीरात अधिक चांगल्या प्रकारे शोषले जाते, कारण शिजवल्यामुळे ऑक्सालेट्सचे प्रमाण कमी होते.
कच्चे पालक काही लोकांना पचायला जड जाऊ शकतात. शिजवलेले पालक मात्र पचनास हलके असून गॅस व पोटदुखीचा त्रास कमी करतात.
कच्च्या पालकामध्ये ऑक्सालेट्स जास्त असल्याने कॅल्शियमचे शोषण अडथळले जाऊ शकते. शिजवलेले पालक खाल्ल्यास ऑक्सालेट्स कमी होतात.
पालक शिजवताना उष्णतेमुळे व्हिटॅमिन C चे काही प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे कच्च्या पालकातून व्हिटॅमिन C अधिक मिळते.
वजन कमी करायचे असल्यास कच्चे पालक (सलाड, स्मूदी) फायदेशीर ठरतात, तर स्नायू बळकटी आणि अशक्तपणासाठी शिजवलेले पालक अधिक उपयुक्त असतात.
तज्ज्ञांच्या मते, दोन्ही प्रकारे पालक खाणेच सर्वाधिक फायदेशीर आहे. कच्चे आणि शिजवलेले पालक आहारात समतोल प्रमाणात समाविष्ट करावेत.