Parenting tips SAAM TV
लाईफस्टाईल

Parenting Tips : पालकांनो! मुलांना घरात एकटे सोडताय? 'या' गोष्टींची घ्या खबरदारी, चिंता होईल दूर

Shreya Maskar

मुलांचे नीट संगोपन करणे ही पालकांची जबाबदारी आहे. आजकाल मुंबईसारख्या शहरात जगायचे असल्यास आर्थिक परिस्थिती चांगली असणे गरजेचे आहे. यामुळे बरेच पालक दोघे सुद्धा नोकरीला जातात. अशावेळी मुलांना कुठे ठेवावे हा प्रश्न पडतो. अशात जर तुमची मुलं थोडी मोठी असतील आणि तुम्ही त्यांना घरी एकटे सोडून जाण्याचा विचार करत असाल, मात्र त्यांच्या काळजीमुळे तुम्हाला चिंता लागून राहिली असेल तर, या गोष्टींची खबरदारी घेऊन तुम्ही टेन्शन फ्री होऊन कामाला जाऊ शकता आणि मुलं देखील घरी सुरक्षित राहील.

मोबाईल

तुम्ही काही कारणामुळे जर मुलांना घरी एकटे सोडून जाणार असाल तर, त्यांना मोबाईल आवश्य द्या. तसेच त्यातील सदस्यांचा नंबर डायल कॉलमध्ये ठेवा म्हणजे इमर्जन्सी असल्यास मुलं पटकन तुमच्याशी संपर्क साधू शकतो. तसेच तुम्ही देखील मुलांशी बाहेर असताना वेळोवेळी संवाद साधू शकता. तसचे मोबाईलमुळे मुलांना जास्त एकटे वाटणार नाही.

उपकरणे

घरातील घातक उपकरणे मुलांना घरी एकटे सोडणार असल्यास बंद ठेवा. उदा. यंत्र कारण यामुळे आरोग्याला भीती असते. विशेषतः बाहेर जायचे असल्यास गॅस सिलिंडर बंद ठेवावा. तसेच चाकू देखील घरात मुलांच्या नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी ठेवा. तुमच्या घरात एखाद्या ठिकाणी विजेच्या तारा उघड्या असतील तर त्या त्वरित बंद करा. विजेचे सॉकेट बंद केल्यामुळे भीती टळते. कारण मुल घरात वावरताना चुकीने विजेचे सॉकेटला हात लागल्याने विजेचा धक्का बसण्याची शक्यता वाढते.

खाण्याची सोय

तुम्हाला घरी येईला किती वाजेल याचा काही अंदाज नसतो, कारण बाहेर गेल्यावर काम वाढत जातात. त्यामुळे जास्तीची खबरदारी घेऊन मुलांची खाण्यापिण्याची उत्तम सोय करून ठेवा. तसेच मुलांच्या हाताशी पटकन जेवण मिळेल असे ठेवा. गॅसचा वापर होणार नाही याची खबरदारी घ्या.

मुलांच्या मनोरंजनाची खबरदारी घ्या

तुम्ही बाहेर गेल्यावर मुलं काय करणार? हे जाणून घ्या. त्यांना अभ्यास, त्यांच्या आवडीच्या गोष्टी करायला सांगा. यात कलात्मक गोष्टींचा अधिक समावेश करा. उदा. चित्रकला, क्राफ्टिंग. तसेच त्यांना खेळण्यास सांगा. यामुळे मुलं कोणत्या ना कोणत्या कामात गुंतून राहतील आणि त्यांचा वेळ निघून जाईल.

आपत्कालीन परिस्थिती

मुलांना आपत्कालीन परिस्थितीला कसे सामोरे जायचे, याचे ट्रेनिंग द्या. घाबरून न जाता प्रसंगावधान दाखवून परिस्थिती सांभाळायला शिकवा. तसेच तुम्ही घरात एकट्याला सोडून जाताना. संपूर्ण घर बंद करून जाऊ नका. खिडकी उघडी ठेवा. यामुळे हवा खेळती राहते. मुलांना सुरक्षित वाटते. तसेच आपत्कालीन परिस्थिती खिडकी महत्त्वाची ठरते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT