नोव्हेंबर महिना सुरू झाला असून राज्यात थंडी जाणवायला सुरूवात आहे. थंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळेच अनेक मुले व्हायरल आजारामुळे आजारी पडू लागली आहे. थंडीमुळे फ्लू आणि श्वसनाच्या समस्या वाढताना दिसत आहे. ज्या लोकांमध्ये प्रतिकारशक्तीचे प्रमाण कमी आहे त्यांना आजार होण्याची शक्यता जास्त आहे.
प्रतिकारशक्तीच्या अभावामुळे प्रामुख्याने लहान मुलांना आजारपण लवकर येते. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती चांगली असणे खूप महत्त्वाचे असते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लहान मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे आहे. आजारापासून दूर राहण्यासाठी आहारात या गोष्टींचा नक्की समावेश करा.
1. लिंबूवर्गीय फळे
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात फळांचा समावेश करावा. त्यात प्रामुख्याने लिंबूवर्गीय फळे म्हणजेच लिंबू, मोसंबी, संत्री, द्राक्षे या फळांचा समावेश करावा. या फळांमध्ये विटामीन सीचे प्रमाण जास्त असते. ही फळे चविष्टदेखील असतात. त्यामुळे मुले ही फळे आवडीने खातात. तसेच तुम्ही या फळांचा ज्यूस करुनदेखील मुलांना देऊ शकतात.
2. दही
दही हे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप जास्त चांगले आहे. दह्यात मोठ्या प्रमाणात प्रोबायोटिक्सचे प्रमाण असते. दही आतड्यांसाठी खूप फायदेशीर आहे. हे मुलांच्या शरीराला आवश्यक पोषक तत्वे देतात. त्यामुळे आजारपण दूर राहते.
3. बेरी
स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरीसारख्या बेरीमध्ये खूप प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात. हे मुलांची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करतात. मुख्य म्हणजे, हिवाळ्यात बाजारात खूप प्रमाणात बेरी उपलब्ध असतात. बेरीमध्ये विटामिन सी, ए आणि आवश्यक जीवनसत्त्वे असतात. बेरी तुम्ही दह्यात घालून खाऊ शकतात.
4. पालेभाज्या
पालेभाज्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर असतात. पालेभाज्यात विटामिन सी, विटामिन के आणि फोलेटसह खूप जीवनसत्त्वे असतात. त्यात जास्त प्रमाणात फायबर असतात. हिरव्या पालेभाज्यांपासून तुम्ही सूप बनवू शकतात. जे लहान मुलांना आवडेल.
5. अदरक
अदरक हे शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यात अँटीऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. घसा खवखवणे, अॅसिडिटी कमी करण्यासाठी अदरक चांगले आहे. त्यामुळे अदरकचा चहा हा शरीरासाठी खूप फायदेशीर असतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.