Manasvi Choudhary
आपल्याकडे अनेकजण आहारासोबत दह्याचे सेवन करतात.
दहीमध्ये व्हीटॅमिन बी २, व्हीटॅमिन बी १२, कॅल्शियम, मॅग्नेशियम व पोटॅशियम निरोगी बॅक्टेरिया असे गणधर्म आहे जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
परंतु काही असे पदार्थ आहेत जे दह्यासोबत किंवा दही खाल्याबरोबर खाल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होईल.
आयुर्वेदानुसार, दही आणि मासे दोन्हीतही भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्याने हे एकत्र खाऊ नयेत, खाल्याने त्वचा व अपचनाची समस्या होऊ शकतात.
दूध व दह्यात फॅट्स भरपूर असल्यानेही ते एकत्र खाऊ नये. दही खाल्याबरोबर दूध पिल्यास ॲसिडिटी, मळमळणे, छातीत जळजळणे, पोट फुगणे व लूज मोशन असे त्रास होऊ शकतात.
दही खाल्यावर लगेच आंबा खाल्याने शरीरात टॉक्सीन्स होऊ शकतात. या फूड कॉम्बिनेशनने ॲलर्जी होऊ शकते.
जेवताना दही व कांदा एकत्र खाऊ नये कारण दही थंड तर कांदा गरम असल्याने एकत्र खाणे चुकीचे आहे. यामुळे त्वचेची ॲलर्जी, रिॲक्शन होऊ शकते.