Parenting Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Parenting Tips: वेळीच लक्ष द्या! लहान बाळ सतत रडतंय? 'ही' असू शकतात कारणं

Reason Behind Babies Crying: अनेक कारणांवरून लहान बाळं रडतात. पण, जर तुमचं बाळ सतत रडत असेल, तर त्यामागचं कारण समजून घेणं गरजेचं आहे. अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं.

Rohini Gudaghe

What Is Reason Behind Babies Crying

लहान मुलांचं रडणं, ही फार सामान्य गोष्ट आहे. लहान बाळांचे हट्ट पुरे झाले नाही, एखादी वस्तू मिळाली नाही, आवडीचं जेवण नसेल तर लहान मुलं रडत असतात. अनेकदा पालक या रडण्याकडे दुर्लक्ष (Babies Crying) करतात. पण, जर बाळ सतत रडत असेल तर त्यामागचं कारण समजून घेणं गरजेचं आहे. कारण मुलांचं सतत रडणं हे फक्त आजारच नाही, तर वेगळ्या कारणांमुळं देखील असू शकते. ती कारणं आज आपण जाणून घेऊ या. (Latest Marathi News)

घट्ट कपडे

अनेक वेळा कपडे घातल्यानंतर मुलं रडायला लागतात. बऱ्याचदा हे कपडे घट्ट असतात. या कपड्यांमुळे बाळाला अस्वस्थ वाटतं. ते जोरजोरात रडू लागतात. त्यामुळे लहान मुलांना नेहमी सैल सुती कपडे (Reason Behind Babies Crying) घालावेत. जेणेकरून ते कपडे त्यांना हालचाल करण्यास योग्य असतील. घट्ट कपड्यांमुळे बाळ चिडचिड करू लागते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आईची अयोग्य जीवनशैली

आईच्या जेवणाचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होतो. जर आईने जास्त तळलेले आणि मसालेदार जेवण खाल्ले, तर त्याचा परिणाम बाळावर दिसून (Babies Crying Causes) येतो. लहान मूल आईचे दूध पिते. त्यामुळे आईच्या जेवणाचा परिणाम थेट बाळाच्या आरोग्यावर होतो. यामुळे त्याला पोटदुखी किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे देखील लहान बाळ रडते.

अति आहार

बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की, बाळाला जास्त खायला घातल्यानंतर ते लवकर मोठं होईल. त्यामुळे अनेक वेळा जाणूनबुजून किंवा नकळत लहान मुलांना गरजेपेक्षा जास्त दूध पाजले होते. काहीवेळा घाईघाईने मुलांना खाऊ घातलं जातं. तेव्हा त्यांना प्रमाणापेक्षा जास्त आहार दिला (latest lifestyle news) जातो. यामुळे लहान मुलांना पोट फुगणे आणि अपचन सारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे बाळ रडते.

शारिरीक हालचाल

लहान बाळाची हाडे अतिशय नाजूक असतात. थोड्याशा निष्काळजीपणामुळे ही हाडे सरकण्याचा, त्यांना इजा पोहोचण्याचा धोका जास्त असतो. या कारणामुळे लहान मुलांची योग्य काळजी घेणं आवश्यक आहे. जर त्यांचे शरीर जास्त ताणले गेले किंवा हातपाय नकळत ओढले गेले, तर ते सतत रडत असतात. याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज (Parenting Tips) आहे.

आजारपण

अनेकदा लहान बाळ सायंकाळी सतत रडत असते. जर बाळ असं रडत असेल, तर त्याकडे त्वरीत लक्ष द्या. अशा वेळी बाळाला पोटशूळ रोग शक्यता असते. या आजारामध्ये लहान मुलांना पोटात दुखतं. त्यांना खूप वेदना होतात. बहुतेक मुले तीन महिन्यांपासून पोटशूळ आजाराने ग्रस्त असतात. या आजारात मुलं अनेक तास सतत रडत राहतात. अशा वेळी डॉक्टरकडे जाणे आवश्यक असतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

IND vs AUS: चेतेश्वर पुजाराची बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत एन्ट्री! या नव्या भूमिकेत दिसणार

Nikhil Rajshirke: बिग बॉस मराठी फेम अभिनेत्यानं केलं लग्न; निखिल राजेशिर्केची पत्नी कोण?

Maharashtra politics : प्रचारापासून मला रोखण्याचा प्रयत्न, वारीस पठाण ढसाढसा रडले, पाहा व्हिडीओ

Delhi Capitals: दिल्लीच्या नव्या कर्णधाराचं नाव ऐकून व्हाल हैराण; ऋषभ पंतनंतर कोण सांभाळणार कमान?

SCROLL FOR NEXT