Child Care Tips : मुलांची उंची वाढवायची आहे? आहारात करा या पदार्थांचा समावेश, दिसेल फरक

Food for child height growth : वाढत्या वयात मुलांची उंची कशी वाढवायची हा पालकांसाठी नवा टास्कच आहे. मुलांची उंची वाढवण्यासाठी पालक बरेच प्रयत्न करतात.
Child Care Tips
Child Care TipsSaam Tv
Published On

Diet For Child Growth :

वाढत्या वयात मुलांची उंची कशी वाढवायची हा पालकांसाठी नवा टास्कच आहे. मुलांची उंची वाढवण्यासाठी पालक बरेच प्रयत्न करतात. काही वेळेस उंची न वाढण्यासाठी आनुवंशिकता जबाबदार असते तर काही वेळा पालकांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या गोष्टी घडतात.

वयानुसार मुलांची (Child) उंची वाढत नाही, त्यावेळी पालकांनी काळजी वाटू लागते. अशावेळी मुले उंची वाढवण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब करतात. जर तुमच्याही मुलांची वाढ खुंटत असेल तर मुलांना हे पदार्थ (Food) खाऊ घाला.

1. पालेभाज्या

पालेभाज्यांमध्ये लोह, कॅल्शियम आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असते. शरीरात रक्त तयार करण्यासाठी लोह महत्त्वाचे असते, जे रक्तातील ऑक्सिजनसाठी चांगले मानले जाते. तसेच यामुळे शरीरात ऊर्जा देखील निर्माण होते. शरीरात कॅल्शियम आणि हाडे मजबूत होऊन त्याचा उंचीवर परिणाम होतो.

Child Care Tips
Parenting Tips : पालकांच्या ४ चुकीच्या गोष्टींमुळे मुलांच्या मानसिकतेवर होतोय परिणाम, वेळीच बदला या सवयी

2. नट्स

बदाम, अक्रोड आणि चिया सीड्स हे शरीरासाठी प्रथिने आणि मॅग्नेशियमचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. जे हाडांच्या निर्मितीसाठी आवश्यक मानले जाते. यामुळे मेंदूचा विकास होतो. तसेच शरीरातील प्रथिने आणि मॅग्नेशियम वाढण्यास मदत होते.

3. प्रथिने

फिश, सोयाबीन यांसारखे आहारात हाय कॅलरीज पदार्थ शरीराला आवश्यक अमीनो ऍसिड तयार करतात. जे शरीरात बिल्डिंग ब्लॉक्स म्हणून काम करतात. प्रथिनांचे विविध स्त्रोत शरीराला आवश्यक अमीनो ऍसिड प्रदान करतात. ज्यामुळे स्नायू आणि उंची वाढण्यास मदत होते.

4. दुग्ध उत्पादने

दुग्धजन्य पदार्थांचे मुलांनी नियमितपणे सेवन केल्यास हाडांची घनता सुधारते. ज्यामुळे उंची वाढण्यास मदत होते. यासाठी मुलांच्या आहारात दूध,चीज आणि दहीचा समावेश करा.

Child Care Tips
Budget Trip : ४० हजारात फिरता येणार परदेशात, पार्टनरसोबत आजच करा प्लानिंग

5. फळे

संत्री, बेरी आणि पपई या फळांमध्ये अधिक प्रमाणात जीवनसत्त्व असते. यात व्हिटॅमिन सी, कोलेजन उत्पादन आणि हाडांच्या आरोग्यासाठी अँटिऑक्सिडंटसाठी आवश्यक आहे. व्हिटॅमिन (Vitamins) सी देखील लोहाचे शोषण करण्यास मदत करते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com