Parenting Tips
Parenting TipsSaam Tv

Parenting Tips : पालकांच्या ४ चुकीच्या गोष्टींमुळे मुलांच्या मानसिकतेवर होतोय परिणाम, वेळीच बदला या सवयी

Parents Bad Habits Affects Child Mental Health: मुलांना पुढे घेऊन जाण्याच्या नादात पालक अशा काही चुका करतात ज्याचा त्यांच्या भविष्यावर तर परिणाम होतो आणि मानसिक आरोग्य देखील ढासळते.
Published on

Child Mental Trauma :

कामाच्या व्यस्त जीवनशैलीमुळे पालकांना मुलांकडे अधिक लक्ष देता येत नाही. परंतु, ते मुलांबद्दल अतिशय संवेदनशील असतात. आपले पाल्यही इतर मुलांपेक्षा प्रत्येक गोष्टीत पुढे जावे त्यांनी चांगले असावे असे प्रत्येकाला वाटते.

मुलांना (Child) पुढे घेऊन जाण्याच्या नादात पालक अशा काही चुका करतात ज्याचा त्यांच्या भविष्यावर तर परिणाम होतो आणि मानसिक आरोग्य (Mental Health) देखील ढासळते. या सगळ्या गोष्टी कळण्यासाठी पालकांना अधिक उशीर झालेला असतो. त्यासाठी आम्ही पालकांच्या अशा काही सवयी सांगणार आहोत, ज्याचा मुलांवर वाईट परिणाम होतो जाणून घेऊ त्याबद्दल

1. दबाव

पालकांच्या दबावामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. त्यामुळे ते सतत चिडचिड करतात. मुलांच्या मनावर नकारात्मक परिणाम होतो. पालकांच्या (Parents) या सवयींमुळे मुले एकटे राहाण्यास पसंत करतात.

Parenting Tips
Relationship Tips : या गोष्टींवरुन कळते पार्टनर होतोय इंसिक्योर, नात्यात पडते फूट; वेळीच घ्या काळजी

2. इमोशनल

पालकांच्या इमोशनलपणामुळे मुलांना कधीकधी स्वत:ची लाज वाटू लागते. कधीकधी इतर लोक त्यांची चेष्टाही करु लागतात. मुलांना सतत चिडवतात यामुळे त्यांच्या मनावर परिणाम होतो. तुम्ही देखील असे करत असाल तर वेळीच ही सवय सोडा.

3. भावनांकडे दुर्लक्ष

मुलांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव कमी असतो. त्यामुळे मुले बरेचदा अनेक गोष्टींना तोंड देतात. अशावेळी पालकांनी मुलांच्या भावनांकडे दुर्लक्ष करु नका. ज्याचा थेट परिणाम त्यांच्या मनावर होतो. ज्यामुळे मुले अधिक शांत होतात.

Parenting Tips
Parenting Tips : मुलांवर ओरडताना-रागवताना तुम्ही देखील या चुका करताय? होऊ शकतो मनावर परिणाम

4. हिंसक होणे

अनेकदा मुलांना चांगले शिकवण्याचा नादात पालक मुलांवर जबरदस्त करतात, मारतात किंवा ओरडतात. ज्याचा परिणाम थेट मुलांच्या मानसिकतेवर होतो. मुले पालकांची प्रत्येक गोष्ट स्विकारत असतात. त्यामुळे ते देखील इतरांशी तसेच वागू लागतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com