Relationship Tips : या गोष्टींवरुन कळते पार्टनर होतोय इंसिक्योर, नात्यात पडते फूट; वेळीच घ्या काळजी

Reason why partner is insecure : नवीन नात्यात किंवा लग्न झाल्यानंतर अनेक जोडप्यांमध्ये सगळ काही सुरळीत सुरु असते. काही वेळेस भांडण गोड असतात तर बरेचदा कडू. प्रत्येक वेळी नात्याला अनेक आव्हांना सामोरे जावे लागते.
Relationship Tips
Relationship TipsSaam tv
Published On

Sign Of Insecure Partner :

नवीन नात्यात किंवा लग्न झाल्यानंतर अनेक जोडप्यांमध्ये सगळ काही सुरळीत सुरु असते. काही वेळेस भांडण गोड असतात तर बरेचदा कडू. प्रत्येक वेळी नात्याला अनेक आव्हांना सामोरे जावे लागते.

एकमेकांसोबत राहिल्यानंतर आपल्याला एकमेकांच्या सवयी आणि गरजा कळतात. पण ही समस्या अरेंज मॅरेज करणाऱ्यांना येतं नाही. या समस्या लव्ह मॅरेंज (Marriage) करणाऱ्या देखील येतात. आजकाल घटस्फोट किंवा विभक्त होण्याची कारणे अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहे. याची अनेक कारणे असू शकतात.

अनेकदा लग्नानंतर कोणत्याही प्रकाराची तडजोड करणे अनेक जोडप्यांना पटत नाही त्यामुळे नात्यात (Relation) किंवा वैवाहिक आयुष्यात असुरक्षितता निर्माण होते. असुरक्षितात ही भावना असून ती वेळीच समजून घेणे, स्वीकारणे आणि नंतर त्यात कार्य करणे आवश्यक असते. जाणून घेऊया नात्यात कोणत्या गोष्टींमुळे नात्यात फूट पडते.

Relationship Tips
Relationship Tips : ती कधीच बोलणार नाही, पण प्रत्येक महिलेला पुरुषांकडून असतात या अपेक्षा...

1. जुन्या गोष्टी पुन्हा नात्यात आणणे

जर तुमचा जोडीदार (Partner) तुमच्या जुन्या गोष्टींवरुन सतत भांडत असेल तर त्याला इंसिक्योर वाटत असते. तो तुम्हाला त्या गोष्टींबद्दल सतत वाईट वाटावे यासाठी बोलत राहातो. यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे नात्यावर परिणाम होतो.

2. शंका घेणे

आपल्या जोडीदाराकडे सतत संशयाने पाहाणे हे देखील इंसिक्योरीटीचे लक्षण आहे. जेव्हा तुम्ही कोणाशी बोलता, घरी लेट येता किंवा इतरांशी विनोद करत असाल तर तुमच्यावर प्रश्नांचा भडिमार केला जातो. अशावेळी नाते फार काळ टिकून राहाणे कठीण होते.

3. भीती

इंसिक्योर जोडीदार नेहमी घाबरत असतो की, तिचा/त्याचा पार्टनर सोडून जाईल. त्यामुळे सतत त्याच त्याच गोष्टी बोलून मन दाखवतो. त्यामुळे नात्यात रोज भांडणे होतात. त्यामुळे बरेचदा नात्यात दरी निर्माण होते.

Relationship Tips
Relationship Tips : तिला किंवा त्याला तुमच्याशी लग्न करायचे आहे की, नाही? या ५ गोष्टींवरुन कळेल

4. प्रेमाचा पुरावा मागणे

तुझं माझ्यावर प्रेमचं नाही असे वारंवार सांगणे किंवा त्याचा पुरावा मागणे हे देखील इंसिक्योर पार्टनरचे लक्षण आहे. यामुळे नात्यात दुरावा येतो. सतत नात्यात संशय घेतल्यामुळे जोडीदार दूर होतो.

5. स्वत:ला विसरा

इतरांची काळजी घेणे ही चांगली गोष्ट आहे. परंतु, तुमचा जोडीदार स्वत:ला विसरुन रात्रंदिवस तुमचाच विचार करत असेल तर यामुळे काही वेळा गोंधळ होतो. यांचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com