Parenting Tips : मुलांवर ओरडताना-रागवताना तुम्ही देखील या चुका करताय? होऊ शकतो मनावर परिणाम

Child Care Tips : वाढत्या वयात मुलांकडून अनेक लहान-मोठ्या चुका होतात. ज्यामुळे पालक त्यांच्यावर सतत रागराग करतात. या वयात मुलांना चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव नसते. त्यामुळे त्यांच्या स्वभावातही बदल होताना दिसतो.
Parenting Tips
Parenting TipsSaam Tv
Published On

Things You Should Never Say To Your Child :

वाढत्या वयात मुलांकडून अनेक लहान-मोठ्या चुका होतात. ज्यामुळे पालक त्यांच्यावर सतत रागराग करतात. या वयात मुलांना चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव नसते. त्यामुळे त्यांच्या स्वभावातही बदल होताना दिसतो.

शाळा किंवा कॉलेजच्या वयात मुलांचे अधिक सवंगडी बनतात ज्यात काही चांगले असतात तर काही वाईट. परंतु, त्याच्या वागण्याचा बोलण्याचा मुलांवर अधिक परिणाम पडतो. अशावेळी मुलांना (Child) चांगले आणि वाईट या गोष्टींची जाणीव पालकांनी (Parents) करुन द्यावी.

अनेकदा पालक मुलांवर ओरडतात. मुलांना सतत टोमणे मारण्याची ही सवय आई-वडिलांसाठी सामान्य गोष्ट असली तरी याचा मुलांच्या मानसिकतेवर (Mental Health) परिणाम होतो. बरेचदा पालक बोलताना शिवीगाळ करणे, इतर मुलांशी तुलना करणे, अपेक्षा ठेवणे, सतत त्यांच्या उणिवा ठळकपणे दाखवणे यांसारख्या गोष्टींचा मुलांच्या मनावर आणि मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो.

Parenting Tips
Parenting Tips : आई-वडिलांच्या चुकीच्या सवयींमुळे मुले जाऊ शकतात डिप्रेशनमध्ये, वेळीच घ्या काळजी

1. चांगले गुण मिळू शकत नाही.

जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांची तुलना इतर मुलांशी करता तेव्हा त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यांच्या मनात इतर मुलांबद्दल मत्सराची भावना निर्माण होते. त्यांना तणावाचाही सामना करावा लागतो. यामुळे मुलांमध्ये आक्रमकपणा वाढतो.

2. आयुष्यात काहीही करु शकणार नाही

मुलांना ओरडताना आई-वडील आयुष्यात काही करु शकत नाही, असे वारंवार म्हणतात. यामुळे मुलांची प्रेरणा कमी होते. तसेच आयुष्यात पुढे गेल्यानंतर मुले त्याचे श्रेय तुम्हाला अजिबात देणार नाही.

Parenting Tips
Relationship Tips : ती कधीच बोलणार नाही, पण प्रत्येक महिलेला पुरुषांकडून असतात या अपेक्षा...

3. मुलींसारखे वागू नका

मुलांना मुली म्हणून टोमणे मारणे. हे काम मुलींचे आहे असे सांगणे ही मोठी चूक आहे. यामुळे मुलांच्या मनात तेढ निर्माण होतो. तसेच ते भेदभाव करु लागतात. मुले मोठी होताना त्यांच्या मनात अनेक गैरसमज निर्माण होतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com