Parenting Tips  Saam TV
लाईफस्टाईल

Parenting Tips : लहान मुलं चुकल्यास पालकांनी चुकूनही 'या' गोष्टी करू नयेत; अन्यथा कोवळ्या मनावर होईल वाईट परिणाम

Parenting Tips For Child : तुम्ही देखील तुमच्या मुलांसोबत असं करत असाल तर जरा थांबा. कारण याने तुमची मुलं डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. त्यामुळे पालकांनी मुलांसोबत या गोष्टी कधीच करू नयेत.

Ruchika Jadhav

लहान मुलं जसजशी मोठी होतात तसतशी ती विविध गोष्टी शिकत असतात. यामध्ये खेळकर स्वभाव असल्याने लहान मुलं अनेक करामती करतात. यामध्ये अनेकवेळा ते असं काही करतात ज्याने त्यांना ओरडा खावा लागतो. ओरडा मिळणार म्हणून काही मुलं शांततेत आधीच आपली चूक सावरण्याचा प्रयत्न करतात.

आपलं मुलं सर्व गोष्टींमध्ये परफेक्ट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. त्यामुळे ते आपल्या मुलांनी थोडी जरी चूक केली की लगेच ओरडतात, त्यांच्यावर रागवताता किंवा त्यांना माफी मागण्यास भाग पाडतात. तुम्ही देखील तुमच्या मुलांसोबत असं करत असाल तर जरा थांबा. कारण याने तुमची मुलं डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. त्यामुळे पालकांनी मुलांसोबत या गोष्टी कधीच करू नयेत.

मुलांवर मोठ्याने ओरडणे

लहान मुलांचं मन नाजूक असतं त्यांना जितकं प्रेमाने सांगितलं जाणार तितकंच त्यांना ते पटकन समजतं. मात्र लहान मुलं हट्टीपणा करतात, ऐकत नाहीत म्हणून काही पालक मुलांवर मोठ्याने ओरडतात. मात्र असं केल्याने मुलांच्या मनात तुमच्याविषयी एक वेगळी भीती निर्माण होते. त्यामुळे मुलं तुमच्यापासून दूर जाऊ शकतात.

चुका दुरुस्त करणे

मुलं चुकलं की काही पालक मुलांच्या चुका करेक्ट करण्याच्या मागे लागतात. ते मुलांना ओरडतात आणि केलेल्या चुकीबद्दल किंवा खोटं बोलल्यास सॉरी बोलायला सांगतात. मात्र असं करणे चूक आहे. मुलांना त्यांच्या चुका सांगण्या ऐवजी त्यांनी असं का केलं हे जाणून घ्या. त्यानंतर मुलांना असे वाटल्याने काय वाईट परिणाम होतात याबद्दल माहिती सांगा. शांततेत सांगितल्याने मुलांच्या मनात तुमच्याविषयी जास्त राग निर्माण होत नाही मुलं सुद्धा पुढच्यावेळी ती चूक करत नाहीत.

ब्लेम करू नका

अनेकदा मजा मस्तीमध्ये मुलांच्या हातून काही चुका होतात. पाणी संडते किंवा आणखी काही महागड्या गोष्टी तुटतात नुकसान होते. अशावेळी पालक मुलांना ओरडतात शिवाय त्यांच्यामुळेच एवढं मोठं नुकसान झालं असं म्हणत पालक आपल्या मुलांना ब्लेम करतात. त्यामुळे मुलं मनातून खाचतात आपण खरोखर फार मोठा अपराध केल्याची भावना त्यांच्या मनात येते.

टीप : ही सामान्य माहिती आहे. पालकांच्या आणि मुलांच्या नात्यातील या गोष्टींचा साम टीव्ही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

Maharashtra Rain Live News: खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग; पुण्यातील टिळक पूल वाहतुकीसाठी बंद

Parliament: अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल, लोकसभेत नेमकं काय घडलं?

Online Gaming Ban Bill : ऑनलाइन गेम खेळणं बंद होणार? केंद्राचं विधेयक, ऑनलाईन गेम 'ओव्हर'

SCROLL FOR NEXT