Parenting Tips : पालकांनो, उन्हाळ्यात मुलांच्या आरोग्याची काळजी कशी घ्याल? या चुका करणे टाळा

Child Care Tips : सध्या उन्हाळा सुरु झाला असून आपल्याला आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातोय. यंदा उष्णतेचा पार अधिक वाढणार असल्याचे हवमाना विभागाने सांगितले आहे. यामुळे आपल्या प्रत्येक स्तरावरुन घराबाहेर पडताना काळजी घ्या असे आव्हान करण्यात आले आहे.
Parenting Tips, Child Care Tips
Parenting Tips, Child Care TipsSaam tv

Summer Care Tips :

सध्या उन्हाळा सुरु झाला असून आपल्याला आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातोय. यंदा उष्णतेचा पार अधिक वाढणार असल्याचे हवमाना विभागाने सांगितले आहे. यामुळे आपल्या प्रत्येक स्तरावरुन घराबाहेर पडताना काळजी घ्या असे आव्हान करण्यात आले आहे.

मुलांच्या वार्षिक परिक्षा सुरु असून काहींचे शाळा आणि कॉलेज सुरु आहे. त्यामुळे रखरखत्या उन्हात घराबाहेर पडताना पालकांसह मुलांच्याही नाकी नऊ येतात. मुलांची त्वचा आणि आरोग्य हे अति संवेदनशील असते. पालक अशा अनेक चुका करतात ज्याचा मुलांना सामना करावा लागतो.

उन्हामुळे (summer Season) शरीरात पाण्याची कमतरता होते, त्वचा जळजळते किंवा अंगाला खाज सुटते अशा समस्येमुळे मुलांना त्रास होतो. मुलांच्या आहारापासून ते त्यांच्या आरोग्यापर्यंत पालकांनी (Parents) कोणत्या चुका करु नये हे जाणून घेऊया

Parenting Tips, Child Care Tips
Summer Care Tips : उन्हाळ्यात त्वचेची आणि केसांची काळजी कशी घ्याल? या महत्त्वाच्या टिप्स फॉलो करा

1. आहारात चूक

जर मुले शाळेत जाणार असतील तर बहुतेक पालक त्याच्या जेवणात पराठे किंवा इतर मसालेदार पदार्थ पॅक करताना चूक करु नका. या काळात मुलांना अॅसिडीटी, पोटदुखी किंवा पोटाशी (Stomach) संबंधित इतर समस्याही होऊ शकतात. उष्ण हवामानात पचनास हलके असणारे पदार्थ त्यांना खाऊ घाला.

2. स्वच्छता

उन्हाळ्यात पालक आपल्या मुलांना तेच तेच कपडे घालू नका. घाम आणि घाणीमुळे त्वचेला संसर्ग होतो तसेच खाज सुटू लागते. त्यामुळे मुलांच्या त्वचेवर वाईट परिणाम होतो. त्यासाठी मुलांना सुती कपडे घाला.

Parenting Tips, Child Care Tips
Summer Food : उन्हाळ्यात या पदार्थांचे अतिसेवन ठरु शकते आरोग्याला हानिकारक, वेळीच खाणे टाळा!

3. उशिरा झोपणे आणि लवकर उठणे

मुले सतत मोबाइल आणि टीव्हीवर जास्त वेळ घालवतात. बरेचदा पालक मुलांना यामध्ये गुंतवूण ठेवतात. असे केल्याने मुल उशिरा झोपते. पुरेशी झोप न मिळाल्याने शारीरिकसोबत मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. त्यासाठी मुलांची झोप पूर्ण होईल याची काळजी घ्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com