Summer Care Tips : उन्हाळ्यात त्वचेची आणि केसांची काळजी कशी घ्याल? या महत्त्वाच्या टिप्स फॉलो करा

Skin Care Tips : उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते कारण, या ऋतुमधील कडक उन्हाचा आणि हवेतील कोरडेपणाचा त्वचेवर परिणाम होतो. यंदा उष्णता अधिक असून या तीव्र उष्णतेपासून त्वचेचे संरक्षण करणे गरजेचे आहे.
Summer Care Tips
Summer Care TipsSaam Tv

Hair Care Tips :

उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते कारण, या ऋतुमधील कडक उन्हाचा आणि हवेतील कोरडेपणाचा त्वचेवर परिणाम होतो. यंदा उष्णता अधिक असून या तीव्र उष्णतेपासून त्वचेचे संरक्षण करणे गरजेचे आहे.

उन्हाळ्याच्या महिन्यांत तापमान वाढत असताना, त्वचा आणि केसांच्या समस्या अनेकांसाठी चिंतेचा विषय ठरतात. कडक उन्हामुळे त्वचेवर (Skin) तेलाचे उत्पादन वाढू शकते, ज्यामुळे मुरुम येतात.

अतिनील किरणांमुळे सनबर्न, अकाली वृद्धत्व आणि पिगमेंटेशन समस्या वाढू शकते. उन्हाळ्यात आर्द्रतेची पातळी देखील आपल्या केसांचे नुकसान करू शकते, ज्यामुळे केसांमध्ये गुंता आणि कोरडेपणा येतो. घाम आणि उष्णतेमुळे टाळूची जळजळ आणि कोंडा होऊ शकतो, ज्यामुळे उन्हाळ्यात (Summer Season) टाळूच्या समस्यांकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.

Summer Care Tips
Dark Circles : डार्क सर्कलमुळे त्रस्त आहात? हा घरगुती उपाय करुन पाहा

कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट आणि डर्मेटो-सर्जन, द एस्थेटिक क्लिनिकच्या डॉ. रिंकी कपूर म्हणतात की, वाढत्या तापमानाने तुमच्या त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी याठिकाणी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. बदलत्या हवामानात त्वचा आणि केसांची (Hair care) निगा राखण्याचे गरजेचे आहे.

1. त्वचा आणि केसांसाठी आवश्यक टिप्स

  • सनस्क्रीन लावून सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून तुमच्या त्वचेचे रक्षण करा. या किरणांच्या दीर्घकाळ संपर्कामुळे सनबर्न होऊ शकते, जे त्वचेमध्ये खोलवर पोहोचू शकते आणि पेशींना हानी पोहोचवू शकते.

  • रासबेरी सारख्या घटकांचा समावेश असलेल्या सनस्क्रीनचा वापर केल्याने अतिनील किरणांपासून बचाव होऊ शकतो आणि त्वचेची जळजळ आणि मुरुमांसारख्या त्वचेच्या समस्यांचा धोका कमी करता येतो.

  • उन्हाळ्यात मॉइश्चरायझर वापरल्याने तुमच्या त्वचेला संरक्षण मिळते. खराब झालेल्या त्वचेचे पोषण आणि त्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी, योग्य मॉइश्चरायझरची निवड करा.

  • हा घटक केवळ त्वचेचा नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करत नाही तर त्वचेवरील अतिरिक्त तेलाचे उत्पादन देखील नियंत्रित करतो, ज्यामुळे उन्हाळ्यात हवामानाच्या बदलांचा सामना करण्यासाठी उपयुक्त ठरते.

Summer Care Tips
Skin Care Tips : उन्हाळ्यात त्वचेला टॅनिंग होण्यापासून कसे वाचवाल?
  • तुमच्या रोजच्या जेवणात विविध फळे आणि भाज्यांचा समावेश करून उन्हाळ्यात तुमच्या खाण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. हा चौरस आहार कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देते. आहारातील व्हिटॅमिन, आणि अँटिऑक्सिडंट्सच्या मुबलक प्रमाणामुळे आपल्या त्वचेचे सूर्याच्या नुकसानापासून संरक्षण करता येते.

  • उन्हाळ्यात, उष्णता आणि आर्द्रतेमुळे तुमची त्वचा तेलकट होऊ शकते, विशेषत: घामामुळे त्वचेचे नुकसान होते. या तेलकटपणामुळे त्वचेवरील छिद्र बंद होतात आणि ब्रेकआउट्सची समस्या निर्माण होऊ शकते. त्वचा स्वच्छ राखण्यासाठी क्लिन्झरचा वापरणे गरजेचे आहे.

  • उन्हाळ्यात, कमीतकमी मेकअप करणे आणि डोळ्यांचा मेकअप टाळणे योग्य राहिल.

Summer Care Tips
Food For Hair : या पोषकत्त्वांच्या कमतरतेमुळे पडू शकते टक्कल, केसांची काळजी घेण्यासाठी हे पदार्थ खा
  • उन्हाळ्याच्या दिवसात शरीर पुरेसे हायड्रेड राहिल याकडे लक्ष द्या. शरीर हायड्रेट्ड राखण्यासाठी रोजच्या दिनचर्येत ग्रीन टी, आइस्ड टी, नारळाचे पाणी आणि काकडीचा रस यांसारखी थंड पेयांचा समावेश करा, भरपुर पाणी प्या. यामुळे डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत होते आणि त्वचा ताजेतवानी वाटू शकते.

  • तुमच्या केसांना होणारे नुकसान टाळण्यासाठी हीट स्टाइलिंग उत्पादनांचा वापर टाळा.

  • उन्हाळ्यात केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी नियमितपणे ट्रिम करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com