कोमल दामुद्रे
वाढत्या उन्हाचा जितका आपल्या शरीरावर परिणाम होतो तितकाच आपल्या त्वचेवरही होतो.
उन्हाळ्यात घराबाहेर पडताना त्वचेची काळजी कशी घ्यायला हवी जाणून घेऊया
अति उष्णतेमुळे किंवा कडक सूर्यप्रकाशामुळे त्वचा जळू लागते. त्वचेचा रंग बदलतो, त्वचा टॅन होते.
टॅनिंग टाळण्यासाठी आपण अनेक कॉस्मेटिकचा वापर करतो. ज्यामुळे त्वचेवर परिणाम होतो.
उन्हाळ्यात काही घरगुती उपाय केल्यास त्वचा उजळण्यास मदत होईल.
कोरफड जेलमध्ये असे काही घटक आहेत. ज्यामुळे त्वचेचे सौंदर्य उजळण्यास मदत होते. यामुळे त्वचेला थंडावा मिळतो.
या जेलने तुमच्या चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा. यामुळे टॅनिंगची समस्या कमी होईल.
काकडीच्या रसामुळे त्वचा आतून हायड्रेट राहते. हा ज्यूस तुम्ही प्या किंवा चेहऱ्यावर लावा.
मधामध्ये उच्च अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. चेहऱ्यावर मध लावल्याने मॉइश्चरायझेशन मिळते तसेच टॅनिंग दूर होण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.