कोमल दामुद्रे
जेवणाची चव वाढवण्यासाठी कढीपत्त्याचा वापर केला जातो. याचा आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदा होतो.
कढीपत्त्यामध्ये अनेक गुणधर्म आहेत. ज्यामुळे आपले आरोग्य सुधारते.
महिनाभर कढीपत्ता खाल्ल्याने आरोग्याला कसा फायदा होतो जाणून घेऊया
रोज सकाळी कढीपत्ता खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
कढीपत्त्यामध्ये जीवनसत्त्व आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. याचे दररोज सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
कढीपत्त्याचे नियमित सेवन केल्याने केस मजबूत होतात. तसेच त्वचेसाठी देखील फायदा होतो.
मधुमेह असणाऱ्यांनी कढीपत्ता खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
दिवसातून ५ ते ६ वेळा कढीपत्ता खावे, यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.