Child Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Child Care Tips : पालकांनो, वाढत्या वयात मुलांची वाढ खुंटतेय? कशी घ्याल काळजी?

Child Growth Issue : वाढ खुंटण्याची समस्या ही एकतर अपुऱ्या पोषक आहारामुळे निर्माण होऊ शकते

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Child Growth And Development :

बालपणीचा काळ हा विकासाचा काळ असतो, पण कधी-कधी विविध कारणांमुळे मुलांच्या वाढीस उशीर होऊ शकतो. आपल्या मुलाची वाढ अपेक्षित गतीने का होत नसावी याबद्दल पालक सतत चिंतेत राहतात आणि कधी-कधी ही भावना त्यांच्यासाठी खूप त्रासदायक बनून जाते.

वाढ खुंटण्याची समस्या ही एकतर अपुऱ्या पोषक आहारामुळे निर्माण होऊ शकते व त्यातून वाढीच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो किंवा गंभीर आजार किंवा पर्यावरणीय घटकांमुळे घडू शकते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जगभरात आज पाच वर्षांखालील वयोगटात वाढ खुंटलेल्या मुलांची (Child) संख्या सुमारे १४९ दशलक्ष इतकी आहे. खरेतर जागतिक आरोग्य परिषदेच्या अहवालातून असे आढळून आले आहे की, अशा मुलांच्या जागतिक आकडेवारीमध्ये एक तृतीयांश हिस्सा भारताचा (India) असून भारतात पाच वर्षांखालील वयोगटातील वाढ खुंटलेल्या मुलांची संख्या ४०.६ दशलक्ष इतकी आहे.

या पार्श्वभूमीवर कॅच-अप ग्रोथ म्हणजे नेमके काय, त्याची कारणे कोणती आणि कॅच-अप ग्रोथच्या या प्रवासात पालक आपल्या मुलांची कशाप्रकारे मदत करू शकतात याविषयी अधिक सखोल माहिती मिळविण्याचा प्रयत्न करू या.

1. कॅच-अप ग्रोथ म्हणजे काय?

कुपोषण हे मुलांची वाढ खुंटण्यामागचे एक प्राथमिक कारण आहे. बरेचदा मुलांना पुन्हा एकदा पुरेसे पोषण मिळू लागले की, त्यांच्या उंची व वजनात वेगाने वाढ झाल्याचे (ग्रोथ स्पर्ट) दिसून येते. याला उत्स्फूर्तपणे आपणहून झालेली कॅच-अप (CU) वाढ असे म्हणतात. ज्या मुलांचा विकास मागे पडत असेल त्यास बरेचदा अधिकच्या कॅलरीज, प्रथिने आणि सूक्ष्मपोषक घटकांची गरज असते.

हे पोषक घटक आरोग्यास (Health) अधिक चांगले ठरतात. त्यांच्यामुळे अपुऱ्या आहाराच्या कालावधीमध्ये राहून गेलेली पोषणातील तूट भरून निघतेच पण त्याचबरोबर पुढील वाढीसाठीही या पोषणाची मदत होते. अनेक मुले पोषक आहार घेत आहे हे खरे असले, तरीही कार्यक्षम पोषण मिळविण्याचे आव्हान पूर्ण करणे गरजेचे आहे. कॅल्शियम, लोह आणि झिंक यांसारखी खनिजे मुलांच्या वाढ व विकासासाठी अत्यावश्यक असतात. त्याचबरोबर मुलांनी शारीरिक हालचालींची गरज असलेल्या व्यायामात उत्साहाने सहभागी व्हावे यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे हा सुद्धा त्यांच्या सर्वांगिण स्वास्थ्याचा एक प्रमुख घटक आहे.

2. पोषक घटकांच्या मदतीने वाढीस प्रोत्साहन कसे द्यावे?

  • योग्य पोषणाचा पुरवठा करणे हे मुलांच्या निरोगी वाढीसाठी आणि सर्व टप्प्यांवरील विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच वयाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासूनच मुलांना असे पोषण जाणीवपूर्वक पुरविणे अत्यावश्यक असते.

  • पोषक घटकांचा अपुरा पुरवठा अर्थात अंडरन्युट्रिशनची समस्या समजून घेण्याची आणि त्यावर उपाय शोधण्याची गरज आहे. अपुरा आहार, पोषक घटक शरीरामध्ये इष्टतम प्रमाणात शोषले न जाणे किंवा पुरेशा कार्यशील नसलेल्या पोषक घटकांचा आहारात समावेश असणे यामुळे ही समस्या उद्भवू शकते.

  • अगदी लहान वयापासूनच मुलांच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित केल्यास कुपोषणामुळे त्यांच्यातील वाढीच्या शक्यतांवर होणारे गंभीर परिणाम टाळता येतील आणि मुले आपल्या वाढीची कमाल क्षमता प्राप्त करतील याची हमी मिळेल.

  • बालपणातील पोषणाचे मूल्यमापन ही गोष्ट तुमचे मूल नियमितपणे भाज्या खाईल इतक्याच गोष्टीची काळजी घेण्यापुरती मर्यादित नाही. उत्तम पोषणाचा मुख्य परिणाम हा केवळ उंची मिळविण्यापुरता मर्यादित नाही, तर मुलांच्या सर्वांगिण विकासाला पाठबळ देणे आणि त्यांची रोगप्रतिकारशक्ती बळकट करण्याशीही त्याचा संबंध आहे. वाढीच्या बाबतीत मागे राहीलेल्या मुलांवर उपचार करण्यासाठी आरोग्यसेवा चिकित्सकांची मदत घ्यायला हवी.

  • मुलांच्या निरोगी आणि सर्वांगीण वाढीस प्रोत्साहन देणे: बहुतेकवेळा लहान मुले शारीरिकदृष्ट्या मोठ्या माणसांहून अधिक सक्रिय असतात, त्यामुळे त्यांना भूकही तुलनेने अधिक लागते. त्यामुळे त्यांनी विविध सकस पदार्थ आणि पोषक घटक असलेला संतुलित आहार घ्यावा याची काळजी घ्या. पुढील काही आरोग्यदायी सवयींच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलांचा विकास साधला जाईल याची दक्षता घेऊ शकता

1.मुलांच्या वाढीस मदत करण्यासाठी वाढीचे मोजमाप घ्या व त्यावर लक्ष ठेवा:

आपल्या मुलांच्या, विशेषत: २-६ वर्षे वयाच्या मुलांच्या वाढीवर नियमितपणे लक्ष ठेवण्यापासून सुरुवात करा. दर तीन महिन्यांनी त्यांची उंची तपासा आणि यासाठी पालकांना ग्रोथ डायरी किंवा ट्रॅकरसारख्या साधनांचा वापर करता येईल. अचूक मोजमाप हे मुलांच्या वाढीची माहिती मिळविण्यासाठी आणि तिचा मागोवा घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

2. योग्य आहार:

आपल्या मुलांच्या सर्वांगीण वाढीला मदत करण्यासाठी त्यांना धान्ये, डाळी, दूध, मांस, फळे आणि भाजी समावेश असलेला संतुलित आहार दररोज द्यायला हवा. यामुळे मुलांना हाडांच्या विकासासाठी आवश्यक असलेली प्रथिनं, जीवनसत्वे आणि खनिजे खात्रीने मिळतात. सर एच. एन. रिलायन्स फाउन्डेशन हॉस्पिटलचे डॉ. पंकज पारेख (एमडी पीडिएट्रिक्स आणि डीसीएच) सांगतात, जेवताना नाटक करणाऱ्या मुलांच्या पालकांनी मुलांना एक परिपूर्ण आहार देण्यासाठी तोंडावाटे घ्यावयाच्या सप्लिमेंट्सचा विचार करायला हवा. कुकी कटर्ससारखी साधने वापरून पदार्थांना विविध गंमतीजंमतीचे आकार द्या, त्यात सफरचंद, काकडीसारख्या फळांचा, भाज्यांचा समावेश करा आणि विविध प्रकारचे पदार्थ असलेला रंगीबेरंगी नाश्ता व जेवण त्यांना द्या.

3.व्यायाम:

मुलांच्या स्क्रीन टाइमवर मर्यादा आणण्यासाठी त्यांच्यासाठी व्यायामाचा एक संतुलित दिनक्रम तयार करा. सुट्टीच्या दिवशी मुलांना गॅजेट-फ्री दिवस पाळण्यासाठी आणि संपूर्ण कुटुंबाबरोबर वेळ घालविण्यासाठी प्रोत्साहित करा. मुलांनी दररोज किमान ३ तास तरी कोणता तरी शारीरिक व्यायाम करावा याकडे लक्ष द्या. यात पोहणे, धावणे, दोरी-उड्या, चालणे किंवा नृत्य यांसारख्या गोष्टींचा समावेश असू शकतो. हाडांच्या आरोग्यात सुधारणा घडवून आणण्यामध्ये आणि एकूणच सर्वांगीण स्वास्थाला पाठबळ देण्यामध्ये शारीरिक व्यायामाची भूमिका महत्त्वाची असते.

सर्वसमावेशक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी एक परिपूर्ण आहार आवश्यक ठरतो, कारण त्यामुळे महत्त्वाचे पोषक घटक शरीरात अधिक चांगल्या प्रकार शोषले जातात. तुमच्या मुलांच्या आहारातून त्यांना पुरेशा कॅलरीज आणि पोषक घटक मिळत नसतील तर ती कमतरता भरून काढण्यासाठी न्यूट्रिशन सप्लिमेंट्सची मदत होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सोलापूरकरांनी कोणाला दिला कौल? विजयाची वैशिष्ट्ये काय?

Maharashtra Assembly Election Result: तुमचा आमदार कोण? २८८ मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी पाहा

Aaditya Thackeray: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; वरळीतून आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा आमदार

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

Dheeraj Deshmukh: लातूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, धीरज देशमुख यांचा पराभव

SCROLL FOR NEXT