कोल्हापूरच्या शाहुवाडी तालुक्यात कंक दांपत्याचा रहस्यमय मृत्यू
सुरुवातीला बिबट्याच्या हल्ल्याचा संशय होता
वन विभागाने या मृत्यामागे बिबट्याच्या हल्ल्याचे कारण नसल्याचे म्हटले आहे
फॉरेन्सिक आणि पोलिस तपास सुरू आहे
कोल्हापुरातून धक्कदायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील परळे निनाई इथल्या कडवी धरण क्षेत्र परिसरात दोन दिवसांपूर्वी वृद्ध कंक दांपत्याचा मृत्यू झाला होता. प्राथमिक अंदाजानुसार बिबट्या सदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात या दोघांचा मृत्यू झाल्याची चर्चा होती. मात्र या दांपत्याचा मृत्यू वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात झालेला नाही असे वन अधिकाऱ्यांचे मत असल्याने या घटनेमागचे गुढ वाढले आहे. वन्य प्राण्याचा हल्ला की घातपात या अनुषंगाने गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूरच्या पथकाने तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परळी निनाई इथल्या कडवी धरण क्षेत्रातील पाणलोट भागाजवळ गोलावणे या ठिकाणी कच्च्या पत्र्याचे शेड उभारून निनू कंक आणि त्यांची पत्नी रखुबाई कंक गेली वीस वर्षे शेळी मेंढीपालन करत होते. रविवारी सकाळी या दांपत्याचे च छिन विच्छिन्न अवस्थेत पडलेले मृतदेह शेड परिसरात आढळून आले.
उदगीर जंगल क्षेत्रालगत हा परिसर येत असल्याने वन्य प्राण्याने कंक दांपत्यावर हल्ला केल्याचा संशय त्यांचे कुटुंब आणि ग्रामस्थांना आहे. मात्र वन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता इथं वन्यप्राण्याकडून हल्ला झाल्याच्या कोणत्याही खुणा दिसून आल्या नाहीत. या घटनेनबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्याने मोठा खुलासा केला आहे.
वन विभागाच्या माहितीनुसार, हा वन्य प्राण्यांचा हल्ला नसून या दाम्पत्यांच्या मृत्यूमागे वेगळचं कारण आहे. शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक तपासणी नंतरच कंक दांपत्याच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल असे वन विभाग आणि पोलीस यंत्रणेचे म्हणणे आहे. त्यामुळे या घटनेमागे गूड अधिक वाढले आहे. ज्या परिसरात कंक दांपत्याचा मृतदेह सापडला त्या शेडला लागूनच असलेल्या एका फार्म हाऊसचे सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलीस तपास करत आहेत. दरम्यान या दांपत्याचा मृत्यू कसा झाला? हा अपघात होता की घातपात हे अद्यापही अनुत्तरित आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.