Punipuri Video Viral  
लाईफस्टाईल

Punipuri Video: पाणीपुरी खाताय की अळीपुरी? पाणीपुरीत आढळल्या जीवंत अळ्या,लातूरमधील व्हिडिओ व्हायरल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

अनेकजण जीभेचे चोचले पुरवण्यासाठी पाणीपुरी खात असतात. मात्र हिच पाणीपुरी तुमच्या जीवावर उठू शकते. कारण पाणीपुरीच्या पाण्यात चक्क जीवंत अळ्या पोहत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय...त्यामुळे खवय्यांमध्ये एकच खळबळ उडालीय.

हा व्हिडीओ पाहा... लातूरमधील गांधी चौकातल्या एका स्वीट होममधील पाणीपुरीच्या पाण्यात चक्क अळ्या पोहत असल्याचं धक्क्दायक चित्र समोर आलंय. एका ग्राहकानंच हा संतापजनक प्रकार उघडकीस आणलाय...पाणीपुरीसोबत देण्यात आलेल्या पाण्यात ही जीवंत अळी निघाली आणि नागरिकांच्या आरोग्याशी सुरु असलेला खेळ्याचं बिंग फुटलं. .मात्र हा ग्राहक एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पाणीपुरीचं पाणी बनवत असलेलं ठिकाण आपल्या मोबाईलमध्ये शूट केलं. हे जर तुम्ही पाहिलं तर पाणीपुरी खाताना तुम्ही 10 वेळा विचार कराल.

ही दृश्यं पाहा. झुरळांचा असलेला वावर, पाणीपुरीसाठी वापरण्यात येणारं डर्टी पाणी.. यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ सुरुय...हा प्रकार फक्त लातूरपुरता मर्यादित नाही तर याआधी पाणीपुरीत लघवी मिसळल्याचा, पाणीपुरीच्या पाण्यात अॅसिड मिसळल्याचा, पाणीपुरीचं पीठ पाण्याने मळल्याचे संतापजनक प्रकार समोर आलेत.

पाणीपुरीच्या ठेल्याकडे खवय्यांची पावलं वळतात. मात्र खवय्यांनी जीभेचे चोचले पुरवण्याच्या नादात आरोग्य धोक्यात घालू नये. मात्र अशा डर्टी पाणीपुरीवाल्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनानं कडक कारवाई करण्याचीही गरज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

SCROLL FOR NEXT