Palak Idli Recipe
Palak Idli Recipe Google
लाईफस्टाईल

Palak Idli Recipe: एकदम पौष्टिक नाश्त्याला बनवा साउथ स्टाईल पालक इडली; लहान मुले आवडीने खातील, सोपी रेसिपी वाचा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्यासाठी पालेभाज्या या खूप फायदेशीर असतात. पालेभाज्यांच्या आहारात समावेश करायला हवा. पालेभाज्यांमुळे शरीराला खूप पोषण मिळते. अशीच एक पालेभाजी म्हणजे पालक. पालक हे शरीरासाठी खूप चांगले असते. परंतु लहान मुले पालकची भाजी खायला नाक मुरडतात. परंतु तुम्ही आता पालकची हिरवी इडली बनवू शकता. पालकची इडली ही शरीरासाठी पौष्टिक असते. त्याचबरोबर लहान मुलेही आवडीने खातात. आज आम्ही तुम्हाला या पालक इडलीची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

पालक इ़डली बनवण्यासाठी साहित्य

  • पालक

  • हिरव्या मिरच्या

  • लसूण

  • तेल

  • बर्फाचे तुकडे

  • रवा

  • दही

  • मीठ

  • इनो

कृती

सर्वप्रथम एका कढईत तेल गरम करुन घ्या. त्यात तेलामध्ये लसूण, बारीक चिरलेल्या मिरच्या टाका आणि चांगले परतून घ्या. यानंतर कढईत बारीक चिरलेली पालकची पाने टाका. त्यानंतर तीन ते चार मिनिटे शिजवून घ्या. हे पालक मिक्समध्ये बारीक करुन घ्या. यात दोन ते तीन बर्फाचे तुकडे टाकून त्यात थंड पाणी टाका. हे संपूर्ण मिश्रण मिक्सरमध्ये पूर्ण बारीक करुन घ्या. त्यानंतर एक कप रवा घ्या. त्यात दही टाका. रवा आणि दही एकत्रित करुन घ्या. त्यात बारीक चिरलेली पालकचे मिश्रण आणि थोडे पाणी टाका. यात चवीनुसार मीठ टाका. हे मिश्रण १५-२९ मिनिटे ठेवा. इडली पात्रात थोडे तेल लावा. तयार मिश्रणात इनो टाका. त्यानंतर एक चमचा पाणी टाकून घ्या. हे मिश्रण इडली पात्रात टाका. या इडली २० मिनिटे शिजवून घ्या. तुम्ही ही इडली कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Teacher's Recruitment Special Report: ऑगस्टमध्ये 10 हजार शिक्षकांची भरती

Schools Closed Tomorrow: मुंबई, ठाण्यासह या जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakha: "ती" वाघनखं महाराजांची नाहीत?

Russia-Ukraine War: रशियन सैन्यानं युक्रेनमधील मुलांच्या रुग्णालयावर डागलं हायपरसॉनिक क्षेपणास्त्र; २४ जण ठार

Marathi Live News Updates: उद्या नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT