Rava Idli Recipe: रविवारी नाश्त्याला काय बनवावं समजत नाहीये? झटपट बनवा रवा इडली

Sunday Breakfast Recipes in Marathi: प्लेन इडली खाऊन तुम्हालाही कंटाळा आला असेल तर ही इडली तुम्ही नक्की ट्राय केली पाहिजे. त्यासाठी थोडी हरभरा डाळ भाजून घ्या. त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, गाजर, जिरे
Rava Idli Recipe: रविवारी नाश्त्याला बनवा झटपट रवा इडली
Rava Idli Recipe in MarathiSaam TV
Published On

रविवारी नाश्त्याला काहीतरी वेगळं खावं असं सर्वांनाच वाटतं. रोजचा उपमा आणि पोहे खाऊन आपण थकलेले असतो. त्यामुळे काहीतरी वेगळं ट्राय करावं असं सर्वांना वाटतं. जर तुम्हाला साउथ इंडियन पदार्थ आवडत असतील तर या रविवारी तुम्ही देखील रवा इडलीची ही रेसिपी नक्की ट्राय करा.

Rava Idli Recipe: रविवारी नाश्त्याला बनवा झटपट रवा इडली
Mango Recipe: जेवणाची चव वाढवण्यासाठी झटपट बनवा पिकलेल्या आंब्याचा रायता

रवा इडलीसाठी साहित्य

  • रवा - १ कप

  • दही- अर्धा कप

  • पाणी - अर्धा कप

  • सुरुवातीला दही रवा आणि पाणी योग्य प्रमाणात मिक्स करून घ्या. मिक्स केलेलं बॅटर १५ ते २० मिनिटांसाठी झाकून ठेवा.

इतर साहित्य

  • हरभरा डाळ- १ टीस्पून

  • मोहरी - अर्धा टीस्पून

  • कढीपत्ता -3-4

  • तेल - 1 टेबलस्पून

  • गाजर - 2 चमचे बारीक चिरून

  • हल्दी पावडर - 1/4 टीस्पून

  • लाल मिरची पावडर - 1/4 टीस्पून

  • मीठ - चवीनुसार

  • जिरे - अर्धा टीस्पून

  • हिरवी मिरची - १ बारीक चिरून

  • हिंग - एक चिमूटभर

  • आले- एक चमचा बारीक चिरून

प्लेन इडली खाऊन तुम्हालाही कंटाळा आला असेल तर ही इडली तुम्ही नक्की ट्राय केली पाहिजे. त्यासाठी थोडी हरभरा डाळ भाजून घ्या. त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, गाजर, जिरे, हिरवी मिरची, आलं मिक्सराल बारीक करून घ्या.

त्यानंतर रव्यामध्ये हे सर्व मिक्स करा. चवीसाठी मीठ, लाल तिखट आणि हळद तसेच थोडंसं हिंग अॅड करा. सर्व बॅटर तयार झाल्यावर इडलीच्या भांड्यात भरून घ्या. सर्व इडली योग्य वेळ लावून छान वाफवून घ्या. या इडल्या थंड झाल्यावर भांड्यातून वेगळ्या करा आणि तयार झाल्या तुमच्या मऊ आणि जाळीदार इडल्या.

या इडल्या तुम्ही सांबर किंवा खोबऱ्याच्या हिरव्या तसेच सफेद चटणीसह खाऊ शकता. शिजलेले पदार्थ तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही हे बॅटर ओव्हनमधून देखील बेक करून घेऊ शकता. रवा इडलीमध्ये आपण आधीच भाज्या आणि मसाले टाकले आहेत. त्यामुळे अन्य कोणती चटणी नसली तरी आपण रवा इडली नुसती देखील खाऊ शकतो.

Rava Idli Recipe: रविवारी नाश्त्याला बनवा झटपट रवा इडली
Mumbai Street Food: मुंबईतील 'हे' स्ट्रीट फूड पुरवतील तुमच्या जिभेचे चोचले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com