Padmini Ekadashi 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

Padmini Ekadashi 2023: अधिक मासातली पहिली एकादशी! या लोकांच्या आयुष्यात होणार मोठा बदल, राशीनुसार करा दान-धर्म

Padmini Ekadashi Date : यावर्षी अधिक महिन्यात येणारी पद्मिनी एकादशी २९ जुलै रोजी आहे.

कोमल दामुद्रे

Padmini Ekadashi 2023 Daan : हिंदू पंचागानुसार प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला एकादशी साजरी केली जाते. यावर्षी अधिक महिन्यात येणारी पद्मिनी एकादशी २९ जुलै रोजी आहे.

या एकादशी तिथीला भगवान विष्णू व लक्ष्मी नारायणाची विधीपूर्वक पूजा केली जाते. यांच्यासाठी उपवास करून लक्ष्मी नारायणाची विधीपूर्वक पूजा केली जाते. या एकादशीला व्रत केल्याने आपल्याला अधिक पुण्य लाभते असे म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रात एकादशी तिथीला दान करण्याचाही नियम आहे. जाणून घेऊया राशीनुसार दान कसे करायचे ते

राशीनुसार करा दान

1. पद्मिनी एकादशीला मेष राशीच्या लोकांनी तांब्याची भांडी, लाल वस्त्र, केशर, गूळ दान करा. असे केल्याने कुंडलीत मंगळ बलवान होतो. यासोबतच मंगळ दोषाचा प्रभावही संपतो.

2. भगवान विष्णूची (Vishnu) कृपा प्राप्त करण्यासाठी पद्मिनी एकादशीच्या तिथीला वृषभ राशींच्या लोकांनी पांढरे वस्त्र, तूप आणि अत्तर दान करा. आर्थिक स्थिती चांगली असेल तर महालक्ष्मी मंदिरात (Temple) चांदीचे पायघोळ आणि चपला दान करा.

3. पद्मिनी एकादशीला मिथुन राशीच्या लोकांनी हिरव्या रंगाची फळे, कपडे, शंख, पितळेची भांडी किंवा नाणी दान करा. एकादशी तिथीला या वस्तूंचे दान केल्याने जीवनातील दु:ख आणि वेदना हळूहळू दूर होतात.

4. कर्क राशीच्या लोकांनी पद्मिनी एकादशीला मंदिरात शंख दान करावे. तसेच पांढऱ्या रंगाचे कपडे, तूप, तांदूळ (Rice) आणि दुग्धजन्य पदार्थांचे दान करावे. असे केल्याने साधकावर भगवान विष्णूची कृपा होते.

5. लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी सिंह राशीच्या लोकांनी एकादशी तिथीला लक्ष्मी नारायण मंदिरात शंख आणि चांदीचे चपळ दान करावे. असे केल्याने साधकावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा विशेष आशीर्वादांचा वर्षाव होतो.

6. कन्या राशीच्या लोकांनी पद्मिनी एकादशी तिथीला विवाहित महिलांना मेकअपचे सामान दान करावे. यासोबतच हिरव्या रंगाची फळे आणि कपडे दान करणे देखील शुभ मानले जाते.

7. भगवान विष्णूची कृपा मिळवण्यासाठी तूळ राशीच्या लोकांनी एकादशी तिथीला पांढरे वस्त्र, अत्तर, मंदिरात सुगंधी फुले, दुधापासून बनवलेली मिठाई दान करावी. असे केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते.

8. एकादशी तिथीला वृश्चिक राशीच्या लोकांनी लाल रंगाचे कपडे, लाल रंगाची मिठाई, केशर, गूळ आणि मध दान करा. तसेच मंदिरात लाल रंगाचे वस्त्र दान करावे.

9. भगवान विष्णू आणि राशी स्वामी हे धनु राशीचे देवता आहेत. त्यामुळे धनु राशीच्या लोकांनी स्टेशनरीच्या वस्तू गरीब मुलांना द्या. तसेच पिवळ्या रंगाचे कपडे आणि फळे दान करा.

10. भगवान विष्णूची कृपा मिळवण्यासाठी मकर राशीच्या लोकांनी निळे वस्त्र, तेल, काळे तीळ, छत्री दान करावी. असे केल्याने नारायणाच्या आशीर्वादांचा वर्षाव होतो.

11. कुंभ राशीच्या लोकांनी पद्मिनी एकादशी तिथीला निळ्या आणि काळ्या रंगाचे वस्त्र दान करावे. शाळेतील लहान मुलांमध्ये स्लेटचे वाटप करा. तसेच मंदिरात काळे तीळ, जव आणि अक्षत दान करा.

12. मीन राशीच्या लोकांनी आपल्या आराध्य भगवान विष्णूची कृपा मिळवण्यासाठी वह्या, पेन्सिल, पेन, पिवळ्या रंगाच्या मिठाई, बेसन लाडू दान करावे. असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

Maharashtra News Live Updates: विधानसभा निवडणूक प्रचारासाठी प्रियंका गांधी येणार कोल्हापुरात

PM Modi Speech : सरकारी योजनांवरून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, VIDEO

एक नंबर! आता कॉलसाठी नसणार SIMची गरज; भारतात पहिल्यांदा Satellite to Device सर्विस सुरू

रणबीर कपूरचे हे ७ चित्रपट बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ, यादीच आली समोर

SCROLL FOR NEXT