Orange Peel Benefits saam Tv
लाईफस्टाईल

Orange Peel Benefits : संत्री नाही तर सालीचेही आहेत आरोग्याला असंख्य फायदे, जाणून घ्या

Amazing Health Benefits : आरोग्यासाठी संत्रीच नाही तर तिच्या सालीचे देखील आरोग्याला अनेक फायदे आहेत.

कोमल दामुद्रे

Health Benefits Of Orange Peel :

संत्री हे फळ आंबट-गोड फळ आहे. संत्रीचा आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो. यामध्ये व्हिटॅमिन सी, आयोडीन, सोडियम, कॅल्शियम यांसारखी खनिजे आढळतात, जी रोगप्रतिकारशक्ती आणि इतर आजारांपासून तुमचे संरक्षण करतात.

परंतु, आरोग्यासाठी संत्रीच नाही तर तिच्या सालीचे देखील आरोग्याला अनेक फायदे आहेत. संत्र्याच्या सालीत जीवनसत्व, फायबर, फोलेट आढळते. जाणून घेऊया याचा शरीराला कसा फायदा होतो

1. हृदयाचे आरोग्य निरोगी

हृदय (Heart) निरोगी ठेवण्यासाठी संत्र्याची साल खूप फायदेशीर आहे. यात असलेल फ्लेव्होनॉइड हेस्पेरिडिन शरीरात असणारी खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. याच्या मदतीने तुम्ही हृदयाचे आरोग्य राखू शकता.

2. फुफ्फुसांसाठी फायदेशीर

संत्र्याच्या सालीमध्ये पुरेशा प्रमाणात जीवनसत्व (Vitamins) असल्यामुळे फुफ्फुसांचे आरोग्य राखण्यासाठी मदत करते. तसेच अनेक संसर्गापासून वाचण्यासही मदत करते.

3. पचनासाठी गुणकारी

संत्र्याची साल ही पचनसंस्थेसाठी गुणकारी आहे. ज्यांना अपचन (Digestion) किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास त्यांच्यासाठी संत्र्याची साल बहुगुणी ठरु शकते. यामध्ये असलेले पेक्टिन पोटात चांगले बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करतात. पचनाची समस्या कमी करण्यासाठी संत्र्याच्या सालीचा चहा पिऊ शकता.

4. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी संत्र्याची साल ही रामबाण आहे. यामध्ये असलेले घटक हे साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. तसेच संत्री देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections Result Live Update : महापालिकांचा कारभारी कोण? थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात

High Blood Sugar: ही ५ लक्षणं दिसली तर समजा नियंत्रणाबाहेर गेलाय डायबेटीस; डॉक्टरांना लगेच करा फोन

Maharashtra Tourism : रोहाजवळील ट्रेकर्ससाठी 'हा' आहे खास किल्ला, वीकेंड ट्रिप होईल बेस्ट

Foods To Avoid: सकाळी रिकाम्यापोटी हे 5 पदार्थ मुळीच खाऊ नका, आरोग्यावर होईल मोठा परिणाम

Aamir Khan : "हिंदीत का बोलू? हा महाराष्ट्र आहे..."; मतदानानंतरचा आमिर खानचा 'तो' VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT